Schools

Schools

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर

PUBLISH DATE 20th January 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कला शिक्षणामध्ये संगीत, नृत्य, नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश करण्यात आला असून या निर्णयामागे विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करण्याचा सीबीएसईचा विचार आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असलेल्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी सीबीएसईने चर्चा केली. कलांच्या समावेशामुळे पारंपरिक शिक्षण आंतरविद्याशाखीय होणार आहे.  

इंग्रजी माध्यमासह राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठीचा पूरक अभ्यासक्रम, दहावी-बारावीचे वाढते निकाल आदी कारणांमुळे पालकांचा ओढा "सीबीएसई' शाळांकडे वाढत असून, या शाळांची राज्यातील संख्या एक हजारावर पोहोचली आहे. राज्यातील एक हजार तीन शाळा सीबीएसईशी संलग्न असून, त्यात जिल्ह्यातील 39 शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे "सीबीएसई'ने आता कलाशिक्षणावर भर देण्याचे ठरविले असून, त्याची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार आहे. 
सीबीएसईशी संलग्न शाळांमध्ये खासगी शाळांचेच प्रमाण जास्त आहे. खासगी शाळा राज्य मंडळाच्या शाळांपेक्षा जास्त शुल्क घेत असूनही पालक सीबीएसईच्या शाळांना पसंती देतात. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सीबीएसईशी संलग्न शाळा आहेत. त्यात खासगी संस्थांच्या शाळांसह केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय या शासकीय शाळांचाही समावेश आहे. गेल्या वर्षीपर्यंत राज्यातील शाळा सीबीएसईच्या चेन्नई विभागाच्या अखत्यारीत येत होत्या. मात्र, यंदाच सीबीएसईने चेन्नई विभागाचे विभाजन करून स्वतंत्र पुणे विभागाची निर्मिती केली. 

सीबीएसईशी संलग्न शाळांमध्ये खासगी शाळांचेच प्रमाण जास्त आहे. खासगी शाळा राज्य मंडळाच्या शाळांपेक्षा जास्त शुल्क घेत असूनही पालक सीबीएसईच्या शाळांना पसंती देतात. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सीबीएसईशी संलग्न शाळा आहेत. त्यात खासगी संस्थांच्या शाळांसह केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय या शासकीय शाळांचाही समावेश आहे.संगीत, नृत्य, नाटकासह पाककलाही 

काय असेल अभ्यासक्रमात 
कला शिक्षणात सीबीएसईने संगीत, नृत्य, दृश्‍यकला आणि नाटक यांना प्राधान्य दिले आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाककलेचीही ओळख करून द्यावी, असे सीबीएसईने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना पाककलेची ओळख करून दिल्याने त्यांना पौष्टिक खाद्य, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते, शेतीची योग्य पद्धत या विषयीही माहिती मिळेल. तसेच विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचीही ओळख होईल, असे सीबीएसईचे म्हणणे आहे. कला शिक्षणाचा भाग म्हणून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाककलेसाठी काही वर्ग घेण्यात यावेत. त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रमाण सारखेच असावे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्यासही हरकत नाही. मात्र, शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे वर्ग समावेशक, संवादी आणि प्रयोगशील असावेत, असेही निर्देश सीबीएसईने दिले आहेत. 

आठवड्याला दोन तास कलाशिक्षण 
अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासूनच करण्यात येईल. त्यामुळे शाळांनी दर आठवड्याला किमान दोन तास कला शिक्षणासाठी देणे आवश्‍यक असल्याचे सीबीएसईने नमूद केले आहे. कला शिक्षणाची परीक्षा होणार नाही, तर वर्षभरातील एकूण प्रक्रियेवर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. त्यात विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जातील, तर कलांची मूलभूत ओळख करून दिली जाईल. 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs 2020 |

 

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
7th April 2024

DMVS Admission 2024

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
30th January 2024

MPSOS Result 2023

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
27th December 2023

NIOS Result 2023 Out

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

सीबीएसई चे नवीन शैक्षणिक धोरण: कलाशिक्षणावर देणार भर
22nd June 2023

JNVST Result 2023