Schools

Schools

भाषा आणि सामाजिक शास्त्रे विषयांसाठी 80 गुणांची लेखी परीक्षा

PUBLISH DATE 10th August 2019

मुंबई, इयत्ता ९ वी ते इ. १२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय दि. ९ जुलै, २०१९ अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन इ.९ वी व इ. १० वी करिता या शासन निर्णयान्वये सन २०१९-२० पासून इ.९ वी व इ. १० करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना तयार करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इ.९ वी व इ. १० करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन 80 गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे राहील अशी घोषणा शिक्षण मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इ.११ वी साठी व शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इ. १२ वी करिता अंतिम मूल्यमापन हे 6५० ऐवजी ६०० गुणांचे राहील. सद्यस्थितीतील पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येणाऱ्या 50 गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल तसेच पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये जल सुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट राहील अशी घोषणा शिक्षण मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

इ.९ वी ते इ.१२ वी च्या विषय योजना, मूल्यमापन योजना (परीक्षा पध्दती) त्या सोबतच अन्य केंद्रीय मंडळांचा अभ्यासक्रम, विषय योजना, मूल्यमापन योजना (परीक्षा पध्दती) याचा अभ्यास करून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याना सर्वसमावेशक विषय योजना व मूल्यमापन पध्दती असावी यासाठी गठीत केलेल्या समितीने केलेल्या अभ्यासातून काही महत्त्वाच्या ‍शिफारशी केल्या आहेत ज्यातून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याना स्पर्धात्मक परीक्षांना सक्षमतेने सामोरे जाता येईल‍. या शिफारशींमध्ये अन्य मंडळाच्या काही चांगल्या गोष्टींचाही समावेश आहे.

पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी "जलसुरक्षा" हा विषय देशाच्या पातळीवर हाती घेतला असल्याने व याचे महत्व विचारात घेऊन जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला असून इ. ९ वी ते इ. १२ वीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे

शासन निर्णयातील प्रमुख तरतूदी इ.९ वी व इ. १० वी.-

1)      लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात येत आहे. 

2)      इ.९ वी व इ. १० करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन 80 गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे राहील.

3)      इ. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी) ही केवळ इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

4)      भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये सीबीएसई प्रमाणे श्रवण व भाषण कौशल्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अन्य विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये गृहपाठ, बहुपर्यायी प्रश्न व उपक्रम याची तरतूद करण्यात आली आहे.

शासन निर्णयातील प्रमुख तरतूदी इ.११ वी व इ. १२ वी.-

1.      लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट केले आहे. 

2.    अंतर्गत मूल्यमापन शैक्षणिक वर्षाच्या शेवटी न करता पूर्ण वर्षभरात करण्याची मुभा राहील यासंदर्भातील नियोजन कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा स्तरावर करण्यात येईल.

३.  इ.११ वी ची वार्षिक परीक्षा इ.११ वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर व इ.१२ वी वार्षिक परीक्षा इ.१२ वी च्या  

    संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित राहील.

४. सीबीएसई मंडळाच्या धर्तीवर लेखी परीक्षेत किमान २५ टक्के बहुपर्यायी/वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश.

११ वी कट ऑफ http://fyjc.vidyarthimitra.org/

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org