Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर २०२१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

PUBLISH DATE 15th March 2021

राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, हिवाळी सत्राच्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे.

२३ मार्चपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा आता १९ एप्रिलपासून घेण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील जवळपास ४५ ते ५० हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या वेबसाइटवर आज, १५ मार्चला जाहीर करण्यात येणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा विलंबाने जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जानेवारी ते मार्चदरम्यान सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये जाहीर करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ४ जानेवारीला सुरू होऊन पूर्ण झाल्या. त्यानंतर ८ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, सध्या त्या परीक्षा सुरू आहेत. मात्र राज्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत होती.

याची दखल घेत, राज्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लावलेले निर्बंध, कॉलेजांमध्ये करोनाबाधित विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षांचे उन्हाळी २०२० परीक्षांची काही विद्याशाखांची निकाल प्रक्रिया सुरू असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या परीक्षा १९ एप्रिलपासून या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

सविस्तर वेळापत्रक वेबसाइटवर

या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक १५ मार्चपासून विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

-------------------------------------------------------------------------------------------------------

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
    Organise 

"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.

This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.

Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.

Registration link: https://bit.ly/3t8zpD0

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर २०२१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर २०२१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
30th November 2023

GNM Exams 2023

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर २०२१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर २०२१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed