Schools

Schools

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या

PUBLISH DATE 23rd September 2021

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने चालू शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्ह्यात १० कलमी कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. या कार्यक्रमाची येत्या महिन्याभरात अंमलबजावणी केली जाणार आहे.

या नव्या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता शालेय जीवनापासूनच सुधारण्यास मदत होणार आहे. या १० कलमी कार्यक्रमाचे प्रारुप (मॉडेल) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (डाएट) विकसित केले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

या दहा कलमी कार्यक्रमातील घटक

  • विद्यार्थी व शिक्षकांसाठी माईंडफुलनेस कार्यक्रम (सजगता)

  • अध्ययन स्तर निश्चिती

  • कृतीपुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे

  • इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे

  • सामान्य ज्ञान पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप करणे

  • विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न

  • विविध गुण दर्शन कार्यक्रमांचे आयोजन करणे

  • इंग्रजी अध्ययन समृद्धी

  • कला, नृत्य, गायन, चित्रकला आणि अभिनय आदींचे प्रशिक्षण देणे

  • शिक्षकांचे सक्षमीकरण करणे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण संक्षिप्त माहिती

  • प्राथमिक शाळांची संख्या ---- ३ हजार ६८९

  • जिल्हा परिषदेचे एकूण शिक्षक ---- ११ हजार २४६

  • आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा --- ६९

  • सातवीपर्यंतच्या शाळा --- ७३२

  • पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळा ---- २ हजार ८८८

  • जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ----- २ लाख ३६ हजार ७३१.

  • एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या ---- १ लाख २० हजार ९१८

  • एकूणपैकी विद्यार्थीनींची संख्या ---- १ लाख १५ हजार ८१३.

"जिल्ह्यातील खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी हा दहा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा उपयोग भविष्यात स्पर्धा परीक्षांसाठी होऊ शकेल."

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
30th January 2024

MPSOS Result 2023

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
27th December 2023

NIOS Result 2023 Out

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवत्ता विकासासाठी १० कलमी कार्यक्रम: जाणून घ्या
22nd June 2023

JNVST Result 2023