Scholarships

Scholarships

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती २०२१: अर्ज प्रक्रियेला सुरुवात

PUBLISH DATE 3rd September 2021

बारावीमध्ये उच्चतम गुणवत्ताप्रपात विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारमार्फत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती (Central Sector Scheme of Scholarship for College and University Students) दिली जाते.

यासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३० नोव्हेंबरर्पंत विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी ज्या विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टॉप २० पर्सेंटाइलमध्ये समावेश असेल त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या प्रक्रीयेमध्ये यंदा महाराष्ट्रातील ७ हजार ४१७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला नव्याने मंजुरी दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. नव्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी केंद्र सरकारकडून तयार करण्यात येणार असून, त्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे. याचसोबत ज्या विद्यार्थ्यांना जुन्या अर्जांचे नूतनीकरण करावयाचे आहे, त्यांनाही अर्ज दाखल करता येणार आहे. नवीन अर्जांसाठी तसेच जुन्या अर्जांचे नूतनीकरण करण्यासाठीही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, ऑफलाइन भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे.

या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जांची महाविद्यालयांना ऑनलाइन पडताळणी करावी लागणार असून, यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. भारत सरकारच्या www.scholorships.gov.in या संकेस्थळावर तसेच उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती मिळणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती २०२१: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
8th February 2024

Scholarship Exam

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती २०२१: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती २०२१: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15th December 2023

Sarthi Exam

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती २०२१: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती २०२१: अर्ज प्रक्रियेला सुरुवात
22nd November 2023

Scholarships To Study In UK