Scholarships

Scholarships

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

PUBLISH DATE 20th April 2024

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. या योजनेच्या अंतर्गत पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या वाढीव जागांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात.

या योजनेसाठी उमेदवारांनी THE (Times Higher Education) किंवा QS (Quacquarelli Symonds) World Ranking २०० मधील परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा लागेल. विभागीय कार्यालयांनी जाहीर केलेल्या जागांच्या विभागणीनुसार विविध शाखा व अभ्यासक्रमांसाठी जागा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी आणि अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्र या शाखांमध्ये प्रत्येकी ३ ते १२ जागा आहेत.

योजनेच्या पात्रता निकषांनुसार, उमेदवार व त्याचे आई वडील किंवा पालक हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत व एकत्रित कौटुंबिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

शिष्यवृत्ती योजनेच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे आहेत -

अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने दोन महिन्याच्या आत परीक्षेचे गुणपत्र, प्रमाणपत्र व प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक.

अभ्यासक्रम संपल्यानंतर व्हिसा मुदतवाढीसाठी परवानगी नाही.

विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.

विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नसल्यास अधिक मुदतवाढीसाठी विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेने परवानगी द्यावी.

एकदा निवड झालेले विद्यापीठ व अभ्यासक्रम बदलण्यात येणार नाहीत.

परदेशात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला कोणतीही अगावू रक्कम भरण्यासाठी मान्यता.

विद्यापीठाकडून अभ्यासक्रमाच्या कालावधीची शिक्षण फी व इतर खर्च सादर केलेला असावा.

परदेशातील वास्तव्यासाठी व्हिसाची मुदतवाढीसाठी मान्यता देण्यात येणार नाही.

परदेशात जाण्यासंबंधी माहिती संचालकांना सादर करावी.

GRE, TOEFL, IELTS इ. परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक.

विद्यार्थ्यांनी निवड केलेले विद्यापीठ व अभ्यासक्रम बदलता येणार नाहीत.

अभ्यासक्रमाचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही व त्यासाठी अतिरिक्त निधीही दिला जाणार नाही.

शासन निर्णयातील इतर अटी व शर्ती विद्यार्थ्यास बंधनकारक.

निवड झालेल्या विद्यार्थ्याने आवश्यक ती कागदपत्रे, करारनामे, बंधपत्रे व हमीपत्र देणे बंधनकारक.  

अभ्यासक्रमाचा कालावधी -

१. पीएचडी-४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा जो कमी असेल तो

२. पदव्युत्तर पदवी-२ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो

३. पदव्युत्तर पदविका- १ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो               

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://foreignscholarship2023.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, संबंधित सहसंचालक, विभागीय कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची साक्षांकित प्रती सादर कराव्यात.

सदर योजनेची अधिक माहिती आणि नोंदणीकृत संस्थांची यादी तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

.क्र.

शाखा / अभ्यासक्रम

पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका

डॉक्टरेट

एकूण

कला

०३

०१

०४

वाणिज्य

०३

०१

०४

विज्ञान

०३

०१

०४

व्यवस्थापन

०३

०१

०४

विधी अभ्यासक्रम

०३

०१

०४

अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्र

१२

०१

१६

औषधनिर्माणशास्त्र

०३

०१

०४

 

एकूण

३०

१०

४०

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
8th February 2024

Scholarship Exam

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
15th December 2023

Sarthi Exam

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
22nd November 2023

Scholarships To Study In UK