Scholarships

Scholarships

महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३

PUBLISH DATE 17th October 2023

महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या एका पालकाला देखील याचा लाभ घेता येईल. याचा प्रीमियम 20 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं. या निर्णयानुसार, ही विमा योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल.

"20 रुपये प्रीमिमय भरुन एका विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी एका वर्षासाठी लागू असेल. तर 62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी 5 लाख रुपये कव्हरेज मिळेल. अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास, 422 रुपये प्रीमियम भरावा लागेल." असं या आदेशात म्हटलं आहे.

यात पुढे म्हटलंय, "प्राथमिक विमाधारक सदस्य हा महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. सेकंडरी विमा सदस्य हा विद्यार्थ्याचा शाळा किंवा कॉलेजमधील प्रवेश अर्जावर नोंदणी असलेला पालक असेल."

या योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. 20 रुपये आणि 422 रुपये प्रीमियम असलेल्या योजना आयसीआयसीआयच्या असणार आहेत. तर 62 रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल.

या घटनांमध्ये मिळणार नाही कव्हर

आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, गर्भधारणा किंवा बाळंतपण, मोटार रॅली किंवा साहसी खेळांमध्ये सहभाग, गृहयुद्धात सहभाग, नक्षलवादी हल्ला वगळता झालेले इतर दहशतवादी हल्ले, दारुच्या प्रभावाखाली झालेली दुर्घटना, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन, विमा लाभार्थीकडून हत्या, न्यूक्लिअर रेडिएशन अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळणार नाही.

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३
8th February 2024

Scholarship Exam

महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३
15th December 2023

Sarthi Exam

महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

महाराष्ट्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर २०२३
22nd November 2023

Scholarships To Study In UK