Scholarships

Scholarships

गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

PUBLISH DATE 5th June 2024

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२५

परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात.

अटी व शर्ती

लाभाचे स्वरूप

विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.

विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम

विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा जास्त नसावे

विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च

विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत QS (Quacquarelli Symodes) Ranking २०० च्या या आतील असावी.

विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी जाहीर करेल या पैकी जी कमी असेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.

शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागा मुलींसाठी राखीव असतील.

विद्यार्थ्यांस परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारतात परत येताना नजीकच्या मागनि (Economy Class) विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल.

निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्तों या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार व शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक ३०-१०-२०२३ व शासन निर्णय नियोजन विभाग दिर्नाक २०-०७-२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी विभागाच्या पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी.

https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in

वरील संकेतस्थळा (वेबसाईट) वरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे १ यांच्याकडे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते दिनांक ३०- ०६-२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जमा करावा.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग,

३ चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे १

दूरध्वनी क्र. ०२०-२६०५५१८५ मेल: dvjntobcsbcwpune@gmail.com

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
8th February 2024

Scholarship Exam

गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
15th December 2023

Sarthi Exam

गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
22nd November 2023

Scholarships To Study In UK