Scholarships

Scholarships

Sarthi Scholarship : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ

PUBLISH DATE 3rd September 2024

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नऊ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमाकरिता ‘क्युएस वर्ल्ड रॅंकिंग’च्या क्रमवारीत दोनशेच्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभागाच्या २५ जुलै २०२४च्या शासन निर्णयानुसार या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेली पदवी परीक्षेतील गुणांची अट ७५ टक्क्यांवरून शिथिल करून ५५ टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणून सुधारित अटीप्रमाणे विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा, यासाठी अर्ज करण्यात मुदतवाढ दिली आहे, असे ‘सारथी’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी स्पष्ट केले आहे

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष :

  • - विद्यार्थी आणि त्याचे आई-वडील, पालक भारताचे नागरिक, तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत

  • - प्रवेश घेतलेल्या किंवा प्रवेशास इच्छुक असलेली परदेशातील शिक्षण संस्था ‘क्यूएस वर्ल्ड रॅंकिंग’च्या क्रमवारीत दोनशेच्या आत असणे बंधनकारक

  • - कुटुंबाचे किंवा उमेदवार नोकरी करत असल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा कालावधी /तपशील : कालावधी

  • - संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक प्रमाणपत्रे  आणि कागदपत्रे अपलोड करणे : ९ सप्टेंबरपर्यंत

  • - ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत, मुळ कागदपत्रे त्यांच्या स्व साक्षांकीत प्रतीसह पडताळणीसाठी सारथी संस्थेच्या कार्यालयात सादर करणे : १० सप्टेंबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


Sarthi Scholarship : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ
8th February 2024

Scholarship Exam

Sarthi Scholarship : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

Sarthi Scholarship : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ
15th December 2023

Sarthi Exam

Sarthi Scholarship : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

Sarthi Scholarship : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ
22nd November 2023

Scholarships To Study In UK