Scholarships

Scholarships

Sakal India Foundation : बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ला करा आजच अर्ज

PUBLISH DATE 1st June 2023

पुणे - सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. फाउंडेशनचे हे ६४ वे वर्ष असून, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून एक लाख रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचप्रमाणे भारतात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या अशा ५० शिष्यवृत्ती देण्यात येतील.

अर्ज कोणी करावा?

परदेशी विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२३-२४) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले. भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी.ला प्रवेश दिल्याबद्दलचे २०२१ किंवा त्या पूर्वीचे विद्यापीठाचे किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता पात्र समजले जातील.

नियम काय?

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड २ वर्षांत किंवा त्याआधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाची पदव्युत्तर किंवा पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये दहा हजार इतकी रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.

अर्जाची मुदत - १५ मे ते १५ जून २०२३

अधिक माहितीसाठी संपर्क

सकाळ इंडिया फाउंडेशन

सकाळ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२

संपर्क क्रमांक : ०२०-६६०३५९३५

ई-मेल : contact @sakalindiafoundation.org/sakalindiafoundation@esakal.com

पोलिसांच्या पाल्यांसाठी केळकर शिष्यवृत्ती

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठीदेखील शिष्यवृत्ती सुरू केली आहे. बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी काही जागा या मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. तरी अशा विद्यार्थ्यांनी, ज्यांना परदेशातील विद्यापीठातील प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनी ‘केळकर शिष्यवृत्तीसाठी’ अर्ज करावा, असे आवाहन सकाळ इंडिया फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Related News

Sakal India Foundation : बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ला करा आजच अर्ज
8th February 2024

Scholarship Exam

Sakal India Foundation : बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ला करा आजच अर्ज
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

Sakal India Foundation : बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ला करा आजच अर्ज
15th December 2023

Sarthi Exam

Sakal India Foundation : बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ला करा आजच अर्ज
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

Sakal India Foundation : बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ला करा आजच अर्ज
22nd November 2023

Scholarships To Study In UK