Scholarships

Scholarships

नव भारत साक्षरता कार्यक्रम २०२२: प्रौढ शिक्षणाला नवी उभारी

PUBLISH DATE 15th October 2022

घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो...अन्‌ त्यात आड आलेले वय (म्हणजे उलटून गेलेले वय) यामुळे शिक्षणाची विस्कटलेली घडी आता पुन्हा एकदा बसण्याची चिन्हे आहेत.

होय, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अनुषंगाने आणि केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्यात प्रौढ शिक्षणासाठी आता ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि २०२१-२२च्या अर्थसंकल्पीय घोषणांनुसार ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ हा २०२२-२३ ते २०२६-२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रौढ साक्षरता वर्गाला पुन्हा नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे.

२०३०पर्यंत १०० टक्के साक्षरता

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’मध्ये प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षण याबाबत उल्लेख केला आहे. धोरणात प्रौढ शिक्षणावरील दिलेल्या शिफारशींसह आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार २०३० पर्यंत सर्व नागरिकांनी साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने देशातील निरक्षरता दूर करणे आणि २०३०पर्यंत १०० टक्के साक्षरता प्राप्त करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्यात ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ योजना राबविण्यात येईल.

अशी आहे योजना

  • सर्वांत पहिल्यांदा १५ ते ३५ वर्षे वयोगटातील नागरिकांना अभियानात सामावून घेऊन साक्षर करणार

  • त्यानंतर ३५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचा विचार करणार

  • ही योजना कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय साक्षरता मिशनकडून आदेश स्पष्ट

  • त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षण संचालनालयातील (योजना) शिक्षण संचालक आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांची राहणार

  • ‘नॅशनल सेंटर फॉर लिटरसी’ आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) राज्य साक्षरता केंद्र निर्माण केले जाणार

योजनेचा उद्देश

  • १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे

  • शिकाऊ नागरिकांमध्ये जीवन व व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे, मूलभूत शिक्षण देणे

  • कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन तसेच स्थानिकांना स्वारस्य असलेले निरंतर शिक्षण देणे

शिकण्याचे वय निघून गेले म्हणून अनेक जण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येत नाहीत. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अक्षर ओळख व संख्याज्ञान याबरोबरच कौशल्य, व्यावसायिक शिक्षणालाही महत्त्व दिल्याने अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करणे शक्य होणार आहे. परंतु शाळाबाह्य झालेल्या आणि आता प्रौढ म्हणून गणना होणारे विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष अशी तरतूद नाही. अशा विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे हे मोठं आव्हान असणार आहे.

- वंदना धोत्रे, समन्वयक, सेकंड चान्स कार्यक्रम, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन

--------------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2022 :

Get complete Admission Guidance without stepping out of your house. 

1) Options-form filling assistance for all rounds of State quota & All India Quota 

2) Guidance in obtaining all Government Documents, necessary for admissions for eligible students (Nationality/Domicile/EWS/EBC/Income/Caste Certificates etc.) 

3) Explanation of difficult instructions given in Admission brochures 

4) Suggestions based on last year's cut offs & College Preference List 

5) Updated information of the rules & regulations issued by the Admission Authority & Govt and Courts from time to time. 

6) Guidance till the end of all rounds. 

7) Dedicated Experienced Counsellors 

Engineering Admission Guidance Form (BE/BTech) :

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


नव भारत साक्षरता कार्यक्रम २०२२: प्रौढ शिक्षणाला नवी उभारी
8th February 2024

Scholarship Exam

नव भारत साक्षरता कार्यक्रम २०२२: प्रौढ शिक्षणाला नवी उभारी
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

नव भारत साक्षरता कार्यक्रम २०२२: प्रौढ शिक्षणाला नवी उभारी
15th December 2023

Sarthi Exam

नव भारत साक्षरता कार्यक्रम २०२२: प्रौढ शिक्षणाला नवी उभारी
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

नव भारत साक्षरता कार्यक्रम २०२२: प्रौढ शिक्षणाला नवी उभारी
22nd November 2023

Scholarships To Study In UK