Schools

Schools

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या

PUBLISH DATE 29th January 2021

करोना महामारीमुळे आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांना यंदा विलंब झाला आहे. मात्र बोर्डाशी संलग्न शाळांचे शैक्षणिक सत्र वेळेत सुरू होणार आहे.

काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने ही घोषणा केली आहे. बोर्डाशी संलग्न शाळांचे २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष मार्च महिन्याच्या मध्यावर आणि जून महिन्याच्या सुरुवातीला सुरू होईल.

बोर्डाने शाळांच्या प्राचार्यांना पाठवलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. टेकड्यांवरील शाळा दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारीत नवं शैक्षणिक वर्ष सुरू करू शकतील.

शहरी भागातील काही आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी फेब्रुवारीत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य शाळा त्या-त्या वेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

काऊन्सिलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या करोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम २०२० च्या संपूर्ण शैक्षणिक वर्षावर झाला आहे. म्हणूनच पुढील वर्ष नियमितपणे सुरू व्हावं असं शिक्षक, विद्यार्थी, पालकांना वाटत आहे. बोर्डाचाही तसाच प्रयत्न आहे. शाळांकडून २०२१-२२ या शैक्षणिक सत्राबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

आयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून म्हणाले, 'आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने शाळा चिंतेत आहेत. या परीक्षा दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी, मार्चमध्ये होणार नाहीत. या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नियमित पद्धतीने होणार आहे.'

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २८ जानेवारी रोजी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) चर्चा करण्यासाठी हा ऑनलाइन वेबिनार झाला होता. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली. सीबीएसईद्वारे दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
30th January 2024

MPSOS Result 2023

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
27th December 2023

NIOS Result 2023 Out

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

आयसीएसई बोर्डाचे नवे शैक्षणिक सत्र मार्च पासून: जाणून घ्या
22nd June 2023

JNVST Result 2023