Schools

Schools

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१

PUBLISH DATE 26th November 2021

करोनामुळे मागील २० महिन्यांहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या मुलांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीचे वर्ग (5th to 12th std schools reopening) सुरू झाल्यानंतर आता ग्रामीण भागांत पहिली ते चौथी आणि शहरी भागांत पहिली ते सातवीचे वर्गही ऑफलाइन सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. शाळांसाठी खबरदारीचे उपाय आणि इतर नियमावली लवकरच जारी करण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) झालेल्या निर्णयाची माहिती दिली. प्राथमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत मांडला होता. त्याला आरोग्य विभाग तसेच बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाणार असून याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतल्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. मात्र पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत अनेक मतमतांतरे होती. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा वेळेत सुरू होणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत होते. यानंतर या प्रस्तावाबाबत आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन कृती दलाच्या तज्ज्ञांशीही चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही हा प्रस्ताव पाठवला होता. गुरुवारच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय‍ घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे, याला प्राथमिकता असेल. लहान मुलांसाठी जर अधिकची खबरदारी घेण्याची आवश्यकता असेल तर त्याबाबतही तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येईल, , असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मुंबई महापालिका (BMC) मास्क (Mask), साबण पुरवणार

राज्य सरकारने पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. त्यात विद्यार्थ्यांना मास्क, हात धुण्यासाठी साबण, प्रवेशद्वारावर तापमान तपासणी, आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

इमारतींचे निर्जंतुकीकरण

करोना नियम पाळूनच शाळा सुरू होणार आहेत. पालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत पहिली ते दहावीपर्यंत १,१५९ शाळा असून साधारण ५०० इमारती आहेत. त्या इमारतींमध्ये दोन दिवसांतच निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
29th August 2024

JNV School Admission Process

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
7th April 2024

DMVS Admission 2024

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
30th January 2024

MPSOS Result 2023

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
27th December 2023

NIOS Result 2023 Out

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

राज्य सरकारतर्फे पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय २०२१
22nd June 2023

JNVST Result 2023