Scholarships

Scholarships

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

PUBLISH DATE 29th July 2021

उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेळापत्रकानुसार आठ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार होती. पण ही तारीख आता बदलली आहे....

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होऊन आठ दिवस झाले नाही, तोच पुन्हा परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार नऊ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. आठ ऑगस्ट रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची लेखी परीक्षा होणार असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेळापत्रकानुसार आठ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार होती. करोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नियमित ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. यंदा एप्रिलमध्ये होणार होती पुन्हा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित झाले. पुन्हा ती पुढे ढकलण्यात आली. आठ ऑगस्ट तारीख निश्चित केल्याचे परिषदेने २० जुलै रोजी कळविले होते. यात पुन्हा बदल करत परीक्षा आठऐवजी नऊ ऑगस्ट रोजी होईल असे परिषदेने स्पष्ट केले. परीक्षेचे हॉलतिकीट संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. परीक्षेपूर्वी काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रात बदल करावयाचा झाल्यास गटशिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांशी चर्चा करून आपल्यास्तरावरून पर्यायी केंद्राची व्यवस्था करावी. परीक्षा केंद्रावरील कोणताही परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे परिषदेने म्हटले आहे.

केंद्राची अडचण होत असल्याने बदल

काही जिल्ह्यांत, आठ ऑगस्ट रोजी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेची केंद्रे अधिग्रहित करण्यात आली आहेत. तसेच काही जिल्ह्यांत विकेंड लॉकडाउनचे कडक पालन करण्यात येत असल्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे आता आठऐवजी, सोमवारी नऊ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.

----------------------------------------------------------------------------------

11thCET

----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल
8th February 2024

Scholarship Exam

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल
15th December 2023

Sarthi Exam

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल
22nd November 2023

Scholarships To Study In UK