Scholarships

Scholarships

पदव्युत्तर कृषीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती २०२०

PUBLISH DATE 7th March 2020

या अकरा अभ्यासक्रमांचा समावेश 

कृषी पदव्युत्तर पदवीसह कृषीच्या ११ अभ्यासक्रमांना ज्यात एम.एस्सी(कृषी), एम.एस्सी(उद्यानविद्या), एम.एस्सी.(वनशास्त्र), एमएफएससी (मत्स्यविज्ञान), एम.टेक.(अन्नतंत्रज्ञान), एम.एस्सी(कृषी जैवतंत्रज्ञान), एम.टेक(कृषी आभियांत्रिकी), एम.एस्सी(गृहविज्ञान), एम.एस्सी(काढणी पश्‍चात व्यवस्थापन), एमबीए(कृषी), एमबीएम(कृषी व्यवसाय व व्यवस्थापन), एम.एस्सी(ए.बी.एम) या अभ्यासक्रमांना व्यावासायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कर्जे आदी सवलती मिळणाचा मार्ग सूकर झाला आहे.

पदवी कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे पदव्युत्तर कृषी (एम.एस्सी) च्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात शिवसेनेचे आमदार डॉ.राहूल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्‍नाद्वारे आवाज उठविला होता. आमदार डॉ.पाटील यांच्या मागणीला यश आले असून शासनाने एम.एस्सी कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील शिष्यवृत्ती देण्यात येईल, असा गुरूवारी शासन निर्णय (ता.पाच) काढला. 

राज्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहूरी), कोकण कृषी विद्यापीठ आहेत. या विद्यापीठात कृषीचे पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा दर्जा दिला असल्याने शिष्यवृत्ती देण्यात येत होती. परंतू, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या म्हणजे एम.एस्सीच्या विद्यार्थ्यांना शासन धोरणाप्रमाणे शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. कृषी पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक दर्जा मिळावा व शिष्यवृत्ती सुरू करावी या मागणीसाठी चार कृषी विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी कृषी शिक्षण व संशोधन परिषद पूणे येथे २५ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन करत होते. याबाबत परभणीतही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलने केली होती. 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


पदव्युत्तर कृषीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती २०२०
8th February 2024

Scholarship Exam

पदव्युत्तर कृषीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती २०२०
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

पदव्युत्तर कृषीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती २०२०
15th December 2023

Sarthi Exam

पदव्युत्तर कृषीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती २०२०
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

पदव्युत्तर कृषीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती २०२०
22nd November 2023

Scholarships To Study In UK