Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट यूजी २०२२: नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार

PUBLISH DATE 1st April 2022

 नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) अंडर ग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट २०२२ चे अधिकृत नोटिफिकेशन संदर्भात महत्वाची अपडेट आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज याचे नोटिफिकेशन जाहीर केले जाऊ शकते. यासोबतच एप्रिलमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक देण्यात येणार आहे. त्यानंतरच उमेदवारांना परीक्षेच्या खऱ्या तारखा कळू शकतील. 

NEET UG 2022: अर्ज एप्रिलपासून सुरु होण्याची शक्यता
जर परीक्षेचे नोटिफिकेशन आठवड्यात प्रसिद्ध झाले तर एप्रिल महिन्यापासून एनटीएद्वारे नीट २०२२ साठी अर्ज सुरू केले जाऊ शकतात. मागील सत्रांप्रमाणेच, नीट २०२२ साठी अर्ज प्रक्रिया एनटीएच्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर आयोजित केली जाईल. सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून विद्यार्थी अर्ज करू शकतील.

NEET UG 2022: परीक्षेला उशीर का?
नीट यूजी २०२२ चे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतरच परीक्षेच्या तारखांबाबत स्पष्टता येईल. मात्र, जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेतली जाऊ शकते, असे मानले जात आहे. नीट परीक्षा बोर्डाच्या परीक्षांशी क्लॅश होऊ नयेत म्हणून असे केले जाण्याची शक्यता आहे.

NEET UG 2022: ऑफलाइन पद्धतीने होणार परीक्षा
यावर्षी नीट यूजी २०२२ मध्ये १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. ही परीक्षा देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे परीक्षेला थोडा वेळ लागू शकतो. तरीही नोटिफिकेशन संबंधित कोणतीही माहिती एनटीएच्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर दिली जाईल. कोणत्याही अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

NEET UG 2022: उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता
देशभरातील विविध वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांमध्ये (MBBS, BDS) प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी ही परीक्षा घेण्यात येते. केंद्र सरकारने नीट परीक्षेत बसण्यासाठी निर्धारित केलेली उच्च वयोमर्यादा रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नीट यूजी २०२२ प्रवेश परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या नीट यूजी परीक्षेसाठी १६.१४ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी ९५ टक्के म्हणजे १३.६६ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


नीट यूजी २०२२: नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

नीट यूजी २०२२: नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार
30th November 2023

GNM Exams 2023

नीट यूजी २०२२: नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

नीट यूजी २०२२: नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed