Medical Admissions 2022-23

Medical Admissions 2022-23

NEET परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला

PUBLISH DATE 12th October 2020

 राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल 16 ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले आहेत.

कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टानं 13 सप्टेंबर रोजी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबर रोजी  एकदा परीक्षा देण्याच्या निर्णयाला हिरवी झेंडी दाखवली आहे.  देशात नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी 3,843 परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एकूण 15.97 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र काही विद्यार्थी कोरोना आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळं परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यांना 14 ऑक्टोबर रोजी एक संधी मिळणार आहे.

नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी हे करा

  1. - सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
  2. - यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
  3. - त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
  4. - नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
  5. - आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA)कडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2020 (NEET UG) 2020 चा निकाल आता 16 तारखेला जाहीर होणार हे स्पष्ट झालं आहे.  ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020  परीक्षा दिली होती ते एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल चेक करु शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. निकालासोबतच एनटीए आज नीट- 2020 परीक्षेची फायनल अंन्सर की देखील जाहीर करेल, असं बोललं जात आहे.

लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडली होती.  कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेत ही परीक्षा घेतली होती.   देशभरातील जवळपास 15 लाख विद्यार्थी 'नीट' मेडिकल प्रवेश परीक्षेला बसले होते.  महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

नीट परीक्षेसाठी देशात 15.97 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन वाढवत 3843 इतकी केली होती. तर प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या 24 वरुन 12 करण्यात आली होती.

ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि  झारखंड राज्यातील सहा मंत्र्यांनी याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनळं यंदा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली.  यावरून अनेकदा राजकारण ही रंगलं, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला.

NEET प्रवेश परीक्षेचा निकाल ntaneet.nic.in आणि nta.ac.in या संकेतस्थळांवर जाहीर केला जाणार आहे.

एनटीएच्या सूत्रांनुसार, एनटीए सोमवारी किंवा मंगळवारी हा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. यासह अंतिम गुणतालिका देखील जाहीर करण्यात येईल.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट १३ सप्टेंबर २०२० रोजी पेन-पेपर स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एनटीएने माहिती दिली होती की परीक्षेत ८५-९० टक्के विद्यार्थी सहभागी झाले होते. कोविड-१९ महामारीमुळे परीक्षा दोन वेळा स्थगित करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यापूर्वी नीटची प्रोव्हिजनल आन्सर की आणि उमेदवारांची NEET OMR आन्सरशीट जारी केली आहे.

अशी असेल मार्किंग पद्धती

NEET 2020 परीक्षेत तीन विभाग होते - फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तीन्ही विभागात १८० बहुपर्यायी प्रश्न होते. यापैकी फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये ४५ प्रश्न तर बायोलॉजीत ९० प्रश्न विचारण्यात आले होते. NEET 2020 परीक्षा एकूण ७२० गुणांची होती. NTA NEET 2020 मार्किंग स्कीमनुसार, योग्य उत्तरासाठी ४ गुण दिले जातात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा होतो.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.