Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट पीजी समुपदेशन प्रक्रिया २०२२: प्रवेशांसाठी पसंतीक्रम भरायला सुरूवात

PUBLISH DATE 13th January 2022

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरोग्य विज्ञानाच्या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना १७ जानेवारीपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. आरोग्यशास्त्राच्या एमडी, एमएस, डिप्लोमा या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील नीट पीजी ही प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे संबंधित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.

NEET प्रवेश परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना MBBS मध्ये १५ टक्के जागा आणि MS, MD अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ५० टक्के जागा अखिल भारतीय कोट्यातून भरल्या जातात. नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगलाठी १२ ते १७ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. १८ जानेवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. २० ते २१ जानेवारी दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. २२ जानेवारी रोजी निकाल लागणार असून २३ ते २८ जानेवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे.

नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंगच्या राऊंड २ साठी ३ ते ७ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत फॉर्मचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. १० ते ११ दरम्यान सीट अलॉटमेंट होणार आहे. राऊंड २ चा निकाल १२ फेब्रुवारी २०२२ रोजी लागणार असून उमेदवारांना १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टींग करावे लागणार आहे.

अशी करा नोंदणी

  1. - नीट पीजी २०२१ च्या काऊन्सेलिंग अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा
  2. आणि नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  3. -नाव, जन्मतारीख, रोल नंबर, नीट पीजी २०२१ नोंदणीकृत कोड, सिक्युरीटी कोड यासारखे तपशील सबमिट करा.
  4. -नीट पीजी काऊन्सेलिंग लॉगिन क्रिडेन्शियल भरुन लॉगिन करा.
  5. -लॉगिन केल्यानंतर पालकांचा तपशील, संपर्क, ग्रेड आणि राष्ट्रीयत्व आदि माहिती भरा.
  6. -नीट पीजी २०२१ अर्ज क्रमांक आणि रोल नंबर भरा.
  7. -श्रेणीनिहाय नोंदणी शुल्क भरा.
  8. -फी भरल्यानंतर त्याची नोंदणी स्लिप तयार होईल.
  9. -नोंदणी स्लिप डाउनलोड करा आणि स्लिपची प्रिंटआउट घ्या.


सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी २०२१ मध्ये ओबीसी आरक्षण आणि इडब्ल्यूएस कोट्यावर निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १० टक्के आरक्षणाची वैधता कायम ठेवली. याचिकेत इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आरक्षण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय कोट्यातील जागांवर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


नीट पीजी समुपदेशन प्रक्रिया २०२२: प्रवेशांसाठी पसंतीक्रम भरायला सुरूवात
12th December 2024

MCC NEET PG Round 2 Counselling

नीट पीजी समुपदेशन प्रक्रिया २०२२: प्रवेशांसाठी पसंतीक्रम भरायला सुरूवात
29th November 2024

MCC NEET PG Counselling 2024

नीट पीजी समुपदेशन प्रक्रिया २०२२: प्रवेशांसाठी पसंतीक्रम भरायला सुरूवात
10th November 2024

AIIMS INI CET 2025 Exam Today

नीट पीजी समुपदेशन प्रक्रिया २०२२: प्रवेशांसाठी पसंतीक्रम भरायला सुरूवात
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

नीट पीजी समुपदेशन प्रक्रिया २०२२: प्रवेशांसाठी पसंतीक्रम भरायला सुरूवात
30th November 2023

GNM Exams 2023

नीट पीजी समुपदेशन प्रक्रिया २०२२: प्रवेशांसाठी पसंतीक्रम भरायला सुरूवात
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed