Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट एमडीएस २०२२: परीक्षा पुढे ढकलली जाणार

PUBLISH DATE 19th February 2022

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET MDS) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Union Ministry of Health and Family Welfare) नीट एमडीएस २०२२ (NEET MDS 2022) परीक्षा पुढे ढकलली आहे.

आता ही परीक्षा फक्त नीट पीजी २०२२ च्या (NEETPG 2022) आसपास घेतली जाईल. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) नीट एमडीएस २०२२ परीक्षेची तारीख ४ ते ६ आठवड्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय आरोग्य मंत्रालयातर्फे एमबीबीएस सारख्या बीडीएससाठी अनिवार्य असणाऱ्या रोटेटिंग इंटर्नशिपची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नीट पीजी आणि एनईईटी एमडीएस परीक्षा आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाला (एनबीई) एक पत्र लिहिले आहे.

नीट पीजी आणि एमडीएस परीक्षांच्या प्रकरणांसंदर्भात मंत्रालयात आढावा घेण्यात आला. या दरम्यान नीट एमडीएस परीक्षा २०२२ (NEET MDS 2022) ची तारीख ४ ते ६ आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सचिव राजीव कुमार यांनी एनबीईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.नीट एमडीएस २०२२ (NEET MDS 2022) आणि नीट पीजी २०२२ (NEET PG 2022) मध्ये समानता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही परीक्षा ६ मार्च २०२२ रोजी होणार होती. २१ मार्चपर्यंत निकाल जाहीर होणार होता. मात्र आता एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. नेमकी तारीख जाहीर केली जाणार आहे. नवीन अपडेटसाठी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 

इंटर्नशिपची तारीख देखील वाढवली
दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ४ महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. यापूर्वी बीडीएससाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती. ही ३१ जुलै २०२२ पर्यंत वाढवली जात आहे. ही इंटर्नशिप नीट एमडीएसमध्ये दिसणे अनिवार्य आहे.

डॉक्टर असोसिएशनची मागणी
युनायटेड डॉक्टर्स फ्रंट असोसिएशनने इंटर्नशिपची अंतिम मुदत आणि प्रवेश परीक्षेची तारीख वाढवण्याची मागणी आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. मंत्रालयाने यापूर्वी नीट पीजी २०२२ ची अंतिम मुदत वाढवली होती आणि आता तोच निर्णय नीट एमडीएस २०२२ वर देखील लागू करण्यात आला आहे.
नीट पीजी आणि नीट एमडीएस मधील फरक
या दोन्ही परीक्षा वैद्यकीय शाखेतील पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जातात. दोन्ही राष्ट्रीय शिक्षण मंडळाने आयोजित केले आहेत. नीट पीजी हा एमबीबीएस कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर नीट एमडीएस ज्यांनी बीडीएस म्हणजेच डेंटल कोर्स (BDS) केला आहे त्यांच्यासाठी आहे.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


नीट एमडीएस २०२२: परीक्षा पुढे ढकलली जाणार
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

नीट एमडीएस २०२२: परीक्षा पुढे ढकलली जाणार
30th November 2023

GNM Exams 2023

नीट एमडीएस २०२२: परीक्षा पुढे ढकलली जाणार
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

नीट एमडीएस २०२२: परीक्षा पुढे ढकलली जाणार
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed