Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट यूजी परीक्षेसाठी वयोमर्यादेची अट नसणार: वैद्यकीय आयोगाचा निर्णय

PUBLISH DATE 10th March 2022

राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (National Medical Commission, NMC) नीट यूजी २०२२ (NEET UG 2022) परीक्षेसाठी पात्रता निकषांमध्ये सुधारणा केली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीला लिहिलेल्या पत्रात, एनएमसीने (NMC) त्यानुसार एनटीएला (NTA) पात्रतेमध्ये सुधारणा करण्याचा आणि त्यातून उच्च वयोमर्यादा काढण्याची सूचना दिली. त्यानंतर एनएमसीने नीट यूजी परीक्षेत बसण्यासाठी विहित वयोमर्यादा काढून टाकली आहे. नीट यूजी परीक्षेच्या वयोमर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

२०१९ मध्ये, NMC ने पदवी परीक्षेसाठी (NEET UG Exam 2022) २५ वर्षांची उच्च वयोमर्यादा लागू केली होती. त्याला उमेदवारांकडून जोरदार विरोध होऊ लागला. यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च वयोमर्यादेची अट आता रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेला कोणतीही निश्चित उच्च वयोमर्यादा नसेल. परीक्षेच्या वर्षात ३१ डिसेंबरपर्यंत १८ वर्षे पूर्ण केलेले उमेदवार परीक्षेस बसण्यास पात्र असतील.
 

आयोगाच्या चौथ्या बैठकीत निर्णय
२१ ऑक्टोबर रोजी झालेल्या आयोगाच्या चौथ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एनएमसीने एनटीएला नोटिफिकेशन जारी करण्यापूर्वी बदलांची नोंद घेण्यास सांगितले आहे. एनटीएतर्फे अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर लवकरच NEET२०२२ च्या वयोमर्यादेसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस परीक्षेसाठी नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.

अंडर ग्रॅज्युएट मेडिकल (Under Graduate Medical) हे २०१८ मध्ये शेवटचे अपडेट करण्यात आले होते. नीट ची वयोमर्यादा आणि विषयांसोबतच शाळेच्या प्रकारावर देखील बरेच निर्बंध होते. सुधारितनीट पात्रता निकष २०२२ नुसार, आता ते सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


नीट यूजी परीक्षेसाठी वयोमर्यादेची अट नसणार: वैद्यकीय आयोगाचा निर्णय
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

नीट यूजी परीक्षेसाठी वयोमर्यादेची अट नसणार: वैद्यकीय आयोगाचा निर्णय
30th November 2023

GNM Exams 2023

नीट यूजी परीक्षेसाठी वयोमर्यादेची अट नसणार: वैद्यकीय आयोगाचा निर्णय
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed