केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोघेही, 'देशात-राज्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही... विनाकारण दहशतीखाली राहू नका', असा धीराचा सूर लावत असताना, आज, बुधवारपासून सुरू होण्याची आशा असलेल्या राज्यातील शाळा अनेक शहरांत बंदच राहतील, हे स्पष्ट झाले आहे.
ओमायक्रॉनची धास्ती त्यास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबर वा त्यानंतरच सुरू होऊ शकतील.
मुंबईसह राज्यभरातील करोनास्थिती झटाट्याने निवळत असताना पहिली ते सातवी इयत्तांच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होतील, अशी अपेक्षा होती. तब्बल २० महिने शाळांचे तोंडही न पाहिलेले विद्यार्थी व त्यांचे पालकही शाळांचे दार उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. शाळा सुरू करताना कोणते नियम पाळावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही राज्यात जारी करण्यात आल्या होत्या. अर्थात, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक महापालिका, पालिका यांच्यावर सोपवण्यात आले होते. आणि याच पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनची जोरदार चर्चा सुरू झाल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती, व मंगळवारी ती खरी ठरली.
ओमायक्रॉनच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि शालेय शिक्षणाशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शाळा १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारणपणे मुंबई महापालिका जो निर्णय घेते त्याच मार्गावर ठाणे महापालिका जाते, असे करोनाकाळात सातत्याने दिसून आले. शाळांच्या निर्णयबाबतची त्याचीच पुनरावृत्ती झाली. ठाण्यातील शाळा १५ डिसेंबरनंतर सुरू होतील, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई येथील शाळाही आता १५ डिसेंबर वा त्यानंतरच सुरू होतील. वसईतील शाळांबाबत काहीशी संभ्रमाची स्थिती होती. पालघरमधील शाळा मात्र आज, बुधवारी सुरू होतील.
किचकट नियमांचे आव्हान
राज्यातील सुरू असलेल्या शाळांसाठी आज, बुधवारपासून नवी मार्गदर्शक तत्वे लागू असतील. शाळा सुरू करताना सहा फुटांचे अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविण्याचे मोठे आव्हान शाळांपुढे असेल. याचबरोबर शासन निर्णयानुसार तीन तास प्रत्यक्ष शाळा झाल्यानंतर पुढील तीन तास जे विद्यार्थी शाळेत आलेले नसतील त्यांचे ऑनलाइन वर्ग घ्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शिक्षकांच्या कामाचे तासही वाढणार आहेत. याचबरोबर शिक्षकांना एकच पाठ तीन वेळा शिकवावा लागणार आहे यामुळे त्यांच्यावर ताण येण्याची शक्यता आहे.
आता नाताळनंतरच?
गेल्या वर्षीही करोनामुळे पहिली ते सातवीच्या शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय पुढे ढकलला गेला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार बहुतांश शाळांना नाताळची सुटी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत शाळा सुरू करायच्या झाल्यास त्या थेट नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्येच सुरू होतील, असेच चित्र आहे.
--------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
JNV School Admission Process
नॅशनल ऑलिम्पियाड प्रोग्रॅम २०२४-२०२५
GK Questions कोणत्या राज्यात रेल्वे जात नाही?
Pune Schools Closed Today Due To Heavy Rains
CBSE Directs Schools To Approve
नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
नवोदय विद्यालय प्रवेश वेळापत्रक जाहीर
CBSE Class 10, 12 Compartment Exam 2024 To Begin Today
CBSE Compartment Exam 2024
NIOS Class 12 Result 2024 Declared
Vasantdada Sugar Institute :
PMP Bus : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास
APOSS Results 2024 SSC And Inter (Out)
RTE Admission: ‘आरटीई’च्या २५ टक्के ऑनलाइन प्रवेशाला प्रारंभ
विद्यार्थ्यांना खुशखबर! उन्हाळी सुटी 2 मे पासून
Delhi Govt Schools Admission 2024-25
DMVS Admission 2024
JNU Admission 2024: Application Process Begins
Karnataka 2nd PUC Result 2024
CISCE ISC Class 12, 11 Revised Syllabus 2024-25
PSEB 5th Result 2024 Out
इयत्ता आठवीपर्यंत ढकलपास आता बंद
BSEB DElEd Dummy Admit Card Released
MPSOS Result 2023
Haryana Class 9, 11 Annual Exam 2024
Delhi Nursery Admissions 2024
Delhi Nursery Admissions 2024
EMRS Answer Key 2023-24
India's First All-Girls Sainik School Inaugurated In Vrindavan
NIOS Result 2023 Out
JKBOSE 10th Result 2023 Date
School times will change in the new year
CBSE, British Council collaborate for school education conference
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
TN Half Yearly Examination 2023
Delhi Nursery Admissions 2024
NVS Admission 2024: Class 9, 11 Registration Closes Today
Delhi Nursery admission 2024-25: Schedule for private schools out
दहावी परीक्षा मार्च २०२४: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु
Delhi Nursery Admission 2024: Admission Process
CBSE Board Exam 2024: Check Class 12 Chemistry sample paper details
CBSE Board Exam 2024: Submit Form Date For Private Candidates Extended
JNVST Class 6 admit card out for phase 1 entrance exam 2023
HDFC Bank Parivartan's ECSS Programme for School Students 2023
SSC Results 2023: CGL, MTS tier 1 results awaited
Maharashtra SSC, HSC Supplementary Results 2023: Results shortly
पदवीधरांना आयकर विभागात नोकरीची मोठी संधी २०२३
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर २०२३
JNVST Result 2023
NVS Class 6 Registration 2024 Application Process Begins
विद्यार्थी पालक संवाद २०२३: शाळा निवडताना
JAC Jharkhand Class 9th result declared 2023
Karnataka SSLC Class 10th results released 2023
AP SSC 10th Results 2023: Result Soon
राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरू होणार
KVS Class 1 Admission 2023-24: Last date to apply
CBSE begins registrations for storytelling competition for classes 3-12
Delhi Nursery Admission 2023: First merit list releasing today
Delhi Nursery admission 2023: First merit list to release on January 20
NVS Class 6th Admission 2023: Applications open
Maharashtra Board Exams Date sheet 2023 : Check
CBSE Class 10th/12th Practical Exam 2023: Schedule released
जेईई मेन्स २०२२: परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट
Delhi nursery admissions 2023: Private schools to commence on December 1
NVS Class 9 Admissions 2023-24: Eligibility, paper pattern
राज्य मंडळाच्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर २०२२
TS SSC Supplementary Results 2022: BSE Class 10 supply result declared
CBSE Compartment Exam Admit Card 2022: How to download
सीबीएसई बोर्ड टर्म २ निकाल २०२२: निकालाबाबत नवीन अपडेट जारी
JNVST Class 6 results declared 2022