Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१: नोंदणी प्रक्रिया आजपासून

PUBLISH DATE 19th January 2022

 ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांसाठी सुरू होणार्‍या नीट यूजी काऊन्सेलिंग (NEET UG Counseling)संदर्भात महत्त्वाची माहिती आहे.

नीट यूजी २०२१ काऊन्सेलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच १९ जानेवारी २०२१ पासून सुरू होत आहे. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांच्या समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ नोंदणीची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे. तर निवड भरण्याची सुविधा २० जानेवारी ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान रात्री ११.५५ वाजता सुरू होईल. एमसीसीने जाहीर केल्यानुसार, नीट यूजी प्रवेशांसाठी AIQ काऊन्सेलिंगच्या चार फेऱ्या आयोजित करेल. दोन नियमित फेऱ्या, मॉप-अप समुपदेशन आणि एक अखिल भारतीय कोटा स्ट्रे व्हॅकेंसी यांचा समावेश आहे.

नीट यूजी काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचे वैयक्तिक, शैक्षणिक, संपर्क आणि इतर तपशील भरणे आवश्यक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांचे काऊन्सेलिंग नोंदणी शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. एमसीसी नीट काऊन्सेलिंग २०२१ दरम्यान, उमेदवारांना प्रवेशासाठी महाविद्यालये तसेच अभ्यासक्रमांची निवड भरावी लागेल.

नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ : AIQ साठी वेळापत्रक
नीट यूजी काऊन्सेलिंग फर्स्ट राउंड : १९ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी
जॉइनिंगसाठी शेवटची तारीख : ४ फेब्रुवारी २०२२
दुसरा राउंड : ९ फेब्रुवारी २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२२
जॉइनिंगची शेवटची तारीख : २६ फेब्रुवारी २०२२
मॉप-अप राउंड : २ मार्च २०२२ ते ११ मार्च २०२२
जॉइनिंगची शेवटची तारीख: १९ मार्च २०२२

या कागदपत्रांची आवश्यकता
नीट काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी करणाऱ्या अर्जदारांना नीट यूजी २०२१ स्कोअर कार्ड, नीट यूजी २०२१ प्रवेशपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), PwD (लागू असल्यास) आणि इतर यासारखी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. उमेदवारांनी नोंदणी करण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ द्वारे, ८३,०७५ एमबीबीएस, २६,९४९ बीडीएस, ५२,७२० आयुष, १,८९९ एम्स आणि २४९ जिपमर एमबीबीएस जागांसाठी प्रवेश दिले जातील.

अधिकृत नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१: नोंदणी प्रक्रिया आजपासून
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१: नोंदणी प्रक्रिया आजपासून
30th November 2023

GNM Exams 2023

नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१: नोंदणी प्रक्रिया आजपासून
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१: नोंदणी प्रक्रिया आजपासून
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed