Schools

Schools

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच

PUBLISH DATE 29th July 2021

दहावीच्या निकालानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याची राज्यातील १६ लाख विद्यार्थी वाट पाहत आहेत. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून याबद्दल कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तथापी ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. तसे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील स्पष्ट केले आहे.

हायलाइट्स:

  • बारावीच्या १६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

  • आज किंवा उद्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता
  • अधिकृत वेबसाइटवर मिळेल माहिती

महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) आज बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात कोणती माहिती देण्यात आली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार ३१ जुलैच्या आधी निकालाची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करणे गरजेचे आहे. कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ ची आज किंवा उद्या घोषणा करेल अशी शक्यता आहे.

यावर्षी महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे. दहावी निकाल २०२१ च्यावेळी ही वेबसाइट बंद पडली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाने हा प्रकार बारावी निकालाच्या बाबतीत होऊ नये याची काळजी घेतली आहे.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज, ईमेल असे पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून किंवा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना याकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.

 


Related News


बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
2nd May 2025

RTE admission 2025-26

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
5th April 2025

KVS Admission 2025

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
3rd April 2025

RTE admission 2025-26:

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
14th February 2025

Maharashtra RTE Admission 2025:

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
29th August 2024

JNV School Admission Process

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
7th April 2024

DMVS Admission 2024

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
30th January 2024

MPSOS Result 2023

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
27th December 2023

NIOS Result 2023 Out

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

बारावीच्या निकालाची घोषणा लवकरच
22nd June 2023

JNVST Result 2023