Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

एमबीबीएसनंतर पीजी डिग्री कोर्स ऐवजी दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा करता येणार

PUBLISH DATE 24th August 2020

 एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या किंवा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्हाला एमबीबीएसनंतर पीजी डिग्री कोर्स करायचा नसेल किंवा करणं शक्य नसेल तर तुमच्याकडे आता पीजी डिप्लोमाचा देखील पर्याय आहे.

केंद्र सरकार आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने याला मंजूरी दिली आहे.

.यासंबंधी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ६ ऑगस्टला एक अधिसूचना देखील जारी केली होती. यात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) अंतर्गत आठ वैद्यकीय शाखांमध्ये पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी नमूद करण्यात आले आहे.

गुरुवारी २० ऑगस्ट रोजी देशभरातील वैद्यकीय तज्ज्ञांचे एक वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यात या तज्ज्ञांनी या निर्णयाचे कौतुक केले. मेडिकल क्षेत्रात यामुळे मोठी सुधारणा होईल असं देशातील नामांकित डॉक्टरांनाही वाटतं.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की देशात पीजी मेडिकलच्या सुमारे ५० हजार जागा आहेत. यासाठी १ लाख ७० हजारांहून जास्त डॉक्टर अर्ज करतात. आता पीजी डिप्लोमा कोर्स सुरू झाल्यानंतर लाखो डॉक्टरांना मेडिकलमधील उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. विशेषत: ग्रामीण भागात स्पेशालिस्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्सची कमतरता भरून निघेल.

मेडिकलच्या पुढील आठ शाखांमध्ये हे पीडी डिप्लोमा कोर्स सुरू होतील -

  1. ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजी (Obstetrics and Gynaecology)
  2. पीडियाट्रिक्स (Paediatrics)
  3. अॅनेस्थेसियोलॉजी (Anaesthesiology)
  4. ट्यूबरक्यूलोसिस अँड चेस्ट डिसीज (Tuberculosis and Chest Disease)
  5. रेडियो डायग्नोसिस (Radio Diagnosis)
  6. फॅमिली मेडिसिन (Family Medicine)
  7. ऑप्थैल्मोलॉजी (Ophthalmology)
  8. ईएनटी (ENT)

कुठे होणार शिक्षण?

या विषयी तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार, कोणत्याही शासकीय किंवा खासगी रुग्णालयात, जिथे १०० हून अधिक बेड आहेत, वरिष्ठ मेडिकल स्पेशालिस्ट आहेत, तेथे हे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले जाऊ शकतात.

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, जेईई, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


एमबीबीएसनंतर पीजी डिग्री कोर्स ऐवजी दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा करता येणार
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

एमबीबीएसनंतर पीजी डिग्री कोर्स ऐवजी दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा करता येणार
30th November 2023

GNM Exams 2023

एमबीबीएसनंतर पीजी डिग्री कोर्स ऐवजी दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा करता येणार
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

एमबीबीएसनंतर पीजी डिग्री कोर्स ऐवजी दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा करता येणार
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed