Scholarships

Scholarships

सीबीएसई शिक्षकांना संशोधनाची संधी २०२२: लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम सुरु

PUBLISH DATE 13th June 2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Central Board of Secondary Education, CBSE) देशभरातील शिक्षकांना संशोधन करण्याची संधी देण्यात येणार आहे.

सीबीएसईने यासाठी लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम (Learning from Practitioners program) सुरू केला आहे. बोर्डाच्या या उपक्रमांतर्गत, सीबीएसईशी संलग्न शाळेतील शिक्षक संशोधन क्षेत्रातील काम करण्यासाठी अर्ज करू शकतात.

या कार्यक्रमांतर्गत, शिक्षकांना अनुदान दिले जाणार आहे. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शिक्षकांना त्यांचे संशोधन पुढे नेण्यासाठी एका वर्षाच्या कालावधीत तीन हप्त्यांमध्ये २५ हजार रुपये दिले जाणार आहेत. शिक्षकांसाठी मार्गदर्शकांचे नेटवर्क तयार करणे, त्यांना अनुदान देणे यासोबतच प्रोत्साहन देऊन सर्वोत्तम नवकल्पना निवडणे हा यामागचा हेतू आहे. ३१ ऑगस्ट ही या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी इच्छुक व्यक्ती http://forms.gle/jkeLMTbam1Ho8Gmr येथे आपले प्रस्ताव सादर करू शकतात.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत असणाऱ्या प्रस्तावाला प्राधान्य दिले जाईल. अर्जदारांनी शिक्षणाशी निगडीत आव्हानांबद्दल संशोधन केले पाहिजे अशी सीबीएसईची इच्छा आहे. या कार्यक्रमांतर्गत निवडल्या जाणाऱ्या शिक्षकांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी २५,००० रुपये अनुदान दिले जाईल.दहावी, बारावीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये बदल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची मूल्यांकन योजना जाहीर केली आहे. अधिकृत परिपत्रकात, CBSE ने २०२२-२३ या मूल्यांकन वर्षासाठी किंवा दहावी, बारावीच्या २०२३ च्या बोर्ड परीक्षांसाठी वार्षिक स्कीम पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला आहे. संलग्न शाळांना पाठवलेल्या परिपत्रकात बोर्डाने या शैक्षणिक वर्षासाठी एकच टर्म किंवा एकच बोर्ड परीक्षा असेल (पूर्वीच्या नियमानुसार) असे म्हटले आहे. अंतिम परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर (CBSE Curriculum 2022-23) असतील. परीक्षा पद्धतीत मात्र बदल करण्यात आला आहे.

CBSE दहावी बोर्ड परीक्षा २०२३ साठी, प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्नांचे ४० टक्के प्रश्न बहुपर्यायी (MCQ) असतील. २० टक्के सक्षमतेवर आधारित प्रश्न असतील आणि उर्वरित ४० टक्के हे व्यक्तिनिष्ठ किंवा लघु/दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असतील. बारावीसाठी, ३० टक्के सक्षमतेवर आधारित, २० टक्के MCQ आणि ५० टक्के लघु/दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असणार आहेत.


Related News


सीबीएसई शिक्षकांना संशोधनाची संधी २०२२: लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम सुरु
8th February 2024

Scholarship Exam

सीबीएसई शिक्षकांना संशोधनाची संधी २०२२: लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम सुरु
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

सीबीएसई शिक्षकांना संशोधनाची संधी २०२२: लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम सुरु
15th December 2023

Sarthi Exam

सीबीएसई शिक्षकांना संशोधनाची संधी २०२२: लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम सुरु
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

सीबीएसई शिक्षकांना संशोधनाची संधी २०२२: लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम सुरु
22nd November 2023

Scholarships To Study In UK