Medical Admissions 2024-25

Medical Admissions 2024-25

बी-फार्म/फार्म-डी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू

PUBLISH DATE 15th November 2021

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) राज्यातील कॉलेजांमध्ये बी-फार्म आणि फार्म-डी या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

प्रवेशाची पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी २४ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली आहे.

एमएचटी - सीईटी परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियांना सुरूवात झाली आहे. बी-फार्म आणि फार्म-डी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहे. विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये नॉन-झिरो गुण असणे आवश्यक आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्यांना १२ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. तर, १२ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून कर्न्फर्मेशन करायचे आहे. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशासाठी आवश्यक असणारी पहिली प्राथमिक गुणवत्ता यादी २४ नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या यादीबाबत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवायचे असल्यास २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान नोंदवावेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रवेशासाठीच्या २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या जागांनुसार विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत कॉलेजांचे प्राधान्य क्रम भरता येईल. प्रवेशाची पहिली यादी ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर जाऊन ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत, असे सीईटी सेलचे आयुक्त आर. एस. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले.

सहा डिसेंबरपासून कॉलेज सुरू

प्रवेशप्रक्रियेच्या पुढील फेऱ्या, पात्रता, नियमावली; तसेच प्रवेशाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना 'सीईटी सेल'च्या www.mahacet.org या वेबसाइटवर मिळेल. प्रवेशित विद्यार्थ्यांचे कॉलेज सहा डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर प्रवेशाची अंतिम तारीख २३ डिसेंबर आहे, असे 'सीईटी सेल'ने सांगितले.

-------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


बी-फार्म/फार्म-डी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू
2nd December 2023

HPSC MO Admit Card 2023

बी-फार्म/फार्म-डी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू
30th November 2023

GNM Exams 2023

बी-फार्म/फार्म-डी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू
20th April 2022

NEET PG 2022: Not Postponed

बी-फार्म/फार्म-डी प्रवेश प्रक्रिया २०२१: ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू
19th February 2022

NEET MDS Exam 2022: Postponed