Scholarships

Scholarships

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे परदेश शिष्यवृत्ती योजना २०२२

PUBLISH DATE 31st May 2022

भटक्या आणि विमुक्त जमाती (VJNT), इतर मागास वर्ग (OBC) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

या प्रवर्गातील इच्छूक विद्यार्थ्यांनी २३ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी. डी. डोके यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे दर वर्षी परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी संचालनालयातर्फे ठरवण्यात आलेल्या अटींची पूर्तता केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती प्राप्त होते. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत २०० क्रमांकाच्या आतील असावी, शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल, अशा अटींचा समावेश आहे.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्जाचा नमूना, शासन निर्णय व सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज 'संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे- १' यांच्याकडे २३ जून २०२२, सायंकाळी ६.१५पर्यंत सादर करता येणार आहे.

अशी असेल शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तींतर्गत विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम मिळणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता, परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येतानाचा विमान खर्च विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे मिळणार आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे परदेश शिष्यवृत्ती योजना २०२२
8th February 2024

Scholarship Exam

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे परदेश शिष्यवृत्ती योजना २०२२
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे परदेश शिष्यवृत्ती योजना २०२२
15th December 2023

Sarthi Exam

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे परदेश शिष्यवृत्ती योजना २०२२
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातर्फे परदेश शिष्यवृत्ती योजना २०२२
22nd November 2023

Scholarships To Study In UK