Scholarships

Scholarships

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२०: अंतरिम निकाल जाहीर

PUBLISH DATE 10th October 2020

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा; तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून; तसेच पालक व विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://www.mscepune.in/ वेबसाइटवर पाहता येणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यापासून या लिंकवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल समजू शकलेला नाही.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.


मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

संकेतस्थळावर तांत्रिक अडचण

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून काही तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावरील निकालाची लिंक उघडत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येत नसल्याची तक्रार केली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

निकाल पाहण्यासाठी थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२०: अंतरिम निकाल जाहीर
8th February 2024

Scholarship Exam

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२०: अंतरिम निकाल जाहीर
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२०: अंतरिम निकाल जाहीर
15th December 2023

Sarthi Exam

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२०: अंतरिम निकाल जाहीर
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२०: अंतरिम निकाल जाहीर
22nd November 2023

Scholarships To Study In UK