Scholarships

Scholarships

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर २०२१

PUBLISH DATE 25th November 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला.

पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवीचे १६.९९ टक्के आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. एकूण १४.८४ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला वैयक्तिक निकाल www.mscepune.in किंवा www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर पाहू शकतील. मुंबई वगळता राज्यातील अन्य केंद्रावर या परीक्षेचे १२ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते.

दृष्टीक्षेपात निकाल -

इयत्ता पाचवी -
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी - ३,३७,३७०
पात्र विद्यार्थी - ५७३३२
पात्रतेची टक्केवारी - १६.९९

इयत्ता आठवी -
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी - २१०३३८
पात्र विद्यार्थी - २३९६२
पात्रतेची टक्केवारी - ११.३९

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरता ५० रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

अंतिम निकाल कधी?

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण इत्यादी दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवल्यास तो स्वीकारला जाणार नाही. या मुदतीत ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगइनमध्ये ३० दिवसांपर्यंत कळवण्यात येईल. हे सर्व अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर २०२१
8th February 2024

Scholarship Exam

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर २०२१
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर २०२१
15th December 2023

Sarthi Exam

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर २०२१
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर २०२१
22nd November 2023

Scholarships To Study In UK