Scholarships

Scholarships

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी अर्जांची प्रक्रिया सुरू

PUBLISH DATE 8th August 2019

इयत्ता दहावीसाठीची राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली. राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून, ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. प्रथमस्तरावरील राज्यस्तरीय परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.

परिषदेने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या वेळापत्रकासह शाळांना सूचनापत्रही पाठविले आहे. विद्यार्थ्यांना www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज शाळेमार्फत भरावयाचे आहेत. विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, नॉनक्रिमिलेयर शाळांनी एकत्रित करायची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे २०१२-१३पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दहावीसाठी दोन स्तरावर घेण्यात येते. दहावी परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येते. एक जुलै २०१९ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतो. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सहा ते ११ सप्टेंबरदरम्यान अर्ज ऑनलाइन नियमित शुल्कासह भरावा लागणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ ते १८ सप्टेंबर, अतिविलंब अर्ज भरण्याची प्रक्रिया १९ ते २७ सप्टेंबर यादरम्यान होईन. राज्यस्तरावरील परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १० मे २०२० रोजी देशभरात घेतली जाणार आहे.

परीक्षेचे स्वरूप असे असेल

राज्यस्तरीय परीक्षेत दोन विषयांची परीक्षा होते. त्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणीचा समावेश आहे. पहिला पेपर हा मानसशास्त्रीय चाचणी असते. त्यामध्ये कार्याकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर आधारित प्रश्न असतात. पेपर-दोन हा इयत्ता नववी, दहावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असतो. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित असे विषय असतात. दोन्ही पेपर प्रत्येकी शंभर गुणांचे असतात. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, कन्नड व तेलुगू या सात माध्यमातून विद्यार्थी पेपर देवू शकतात. राज्यस्तरावरून यशस्वी झालेले विद्यार्थी राष्ट्रीयस्तरावर परीक्षेला पात्र ठरतात. जी परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेतर्फे घेतली जाते. त्यात मूल्यांकनाची निगेटिव्ह मार्किंग (वजा गुण) पद्धत असते.

http://nts.mscescholarshipexam.in/ 

११ वी कट ऑफ http://fyjc.vidyarthimitra.org/

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------