Scholarships

Scholarships

नेस्ट स्कॉलरशीप २०२०: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

PUBLISH DATE 19th April 2020

श्रीमानजी इव्हेंट्स मॅनेजमेंट सेंटर इंटरनेशनल (एसईएमसीआय) ने २३ व्या राष्ट्रीय शिक्षण आणि शिष्यवृत्ती चाचणी (नेस्ट - सिनिअर) २०२० साठी अर्ज मागविले आहेत.

बारावी विज्ञान शिकणारे विद्यार्थी, विज्ञान, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रम शिकणारे किंवा अभियांत्रिकी (अंतिम वर्ष) पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. ही राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती चाचणी आहे जी देशातील ६५ प्रमुख परीक्षा केंद्रांवर घेतली जाते. सिनीअर कॅटेगरीत या चाचणीसाठी निवडलेल्या उमेदवारांना ४० हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे. स्टुडंट्स युनिटी फाउंडेशन ऑफ इंडियाने ही शिष्यवृत्ती पुरस्कृत केली आहे.

​पात्रता

नेस्ट सीनियर - १ साठी, १२ वी वर्ग (विज्ञान) किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा अंतिम वर्ष किंवा विज्ञान / अभियांत्रिकी / वैद्यकीय विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी / विद्यार्थी अर्ज करु शकतात.

नेस्ट सीनियर -२ साठी विज्ञान / अभियांत्रिकी / वैद्यकीय विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे तृतीय / चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

लाभ

नेस्टचे विद्यार्थ्यांना बरेच फायदे आहेत. एकतर शिष्यवृत्ती मिळते. नेस्ट-सीनियर I प्रकारात ३५ हजार आणि नेस्ट सीनियर II प्रकारात ४० हजार रुपये मिळतात. विद्यार्थ्यांना देश-विदेशातील मोठ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या शिष्यवृत्तीचं उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची आवड, कौशल्य, ट्रेंड आणि अभ्यास एकत्र आणता येईल, अशाप्रकारे नेस्टची परीक्षा अशा प्रकारे डिझाइन केली गेली आहे. या परीक्षेचं पॅटर्न जीमॅट, जीआरई सारख्या जागतिक दर्जाच्या परीक्षांवर आधारित आहे. तथापि, या परीक्षेची काठिण्य पातळी जेईई अॅडव्हान्स्ड आणि मेन्स दरम्यान मानली जाते.

​महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे. नोव्हेंबरपर्यंत देखील विद्यार्थी अर्ज करू शकतात. परंतु, त्यासाठी त्यांना १०० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. डिसेंबरपर्यंत देखील अर्ज देखील करू शकता, ज्यासाठी विद्यार्थ्यांना २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

​अर्ज कसा करावा

नेस्ट स्कॉलरशीपमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून फॉर्म आणि फी भरू शकता. आधी येथे क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर येथे क्लिक करा आणि लॉगिन करून फॉर्म भरा. वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन फी जमा करुन अर्ज सबमिट करू शकता किंवा अर्ज डाऊनलोड करुन भरा आणि फीचा डिमांड ड्राफ्ट पोस्ट करा. ऑफलाइन मोडमध्ये फी जमा करण्यासाठी 'एसईएमसीआय इंडिया'च्या फेवरमध्ये ६०० रुपये (नेस्ट सीनियर -१ साठी) किंवा ७०० रुपये (नेस्ट सीनियर -२) चा डिमांड ड्राफ्ट तयार करावा. यानंतर फॉर्म आणि डिमांड ड्राफ्ट 'बी -१, पिकॅडली फ्लॅट्स, ५७-जे, क्लीयर रोड, भायखळा, मुंबई ४००००८' च्या पत्त्यावर पाठवावा.

​पेपर पॅटर्न

नेस्ट - १ आणि २ चा पेपर चार विभागात विभागलेला आहे. यामध्ये पहिलं सेक्शन दोन्ही पेपरसाठी वेगवेगळं असतं, उर्वरित चार समान असताता. नेस्ट -१ चा पहिला विभाग फिजिक्स-केमिस्ट्रीचा आहे तर नेस्ट -२ मध्ये तो टेक्निकल अॅप्टीट्यूडचा आहे. दुसरा विभाग गणित किंवा जीवशास्त्र, तिसरा इंग्रजी भाषा, चौथा लॉजिक रीझनिंग आणि जनरल अवेअरनेसचा आहे. सर्व विभाग ५०-५० गुणांचे आहेत. पेपरमध्ये एकूण २०० प्रश्न विचारले जातात जे २०० गुणांचे आहेत. सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत. चाचणी एकूण 2 तासांची आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

 


Related News


नेस्ट स्कॉलरशीप २०२०: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
8th February 2024

Scholarship Exam

नेस्ट स्कॉलरशीप २०२०: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

नेस्ट स्कॉलरशीप २०२०: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
15th December 2023

Sarthi Exam

नेस्ट स्कॉलरशीप २०२०: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

नेस्ट स्कॉलरशीप २०२०: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
22nd November 2023

Scholarships To Study In UK