Scholarships

Scholarships

महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

PUBLISH DATE 1st August 2019

महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने लक्ष्मण विष्णू केळकर आणि उषा लक्ष्मण केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन शिष्यवृत्या सुरू केल्या आहेत. राज्यात कार्यरत असणाऱ्या आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. आलेल्या अर्जामधून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा दोघांची शिष्यवृत्तीसाठी निवड होईल. 

फाउंडेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांपासून (२००९-१०) ही शिष्यवृत्ती सुरू आहे. त्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च २०१९ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणासह अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, वास्तुविशारद, नर्सिंग तसेच विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असणे गरजेचे आहे. पात्र विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा. दोन्ही शिष्यवृत्या प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या मिळणार आहेत. 

असा करा अर्ज 
पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर अर्ज करावेत. अर्जात स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक, मार्च २०१९ च्या उच्च माध्यमिक परीक्षेतील गुण तसेच, पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा उल्लेख करावा. अर्जासोबत गुणपत्रिकेची, उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत तसेच, पोलिस खात्यात असल्यासंबंधी पत्र जोडावे. 

अर्जासाठी मुदत 
अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१९ आहे. आलेल्या सर्व अर्जांमधून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे संपर्क केला जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क - ०२०-६६२६२३७३ (सकाळी १०.३० ते ५ सुट्ट्यांचे दिवस वगळून)

अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत   
कार्यकारी सचिव, 
सकाळ इंडिया फाउंडेशन, 
सकाळ ऑफिस, 
फ्लॉट नं. २७, नरवीर तानाजीवाडी, 
साखर संकुल जवळ, 
पीएमटी डेपोजवळ, 
शिवाजीनगर, पुणे - ४११००५.

 

११ वी कट ऑफ http://fyjc.vidyarthimitra.org/

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------


Related News


महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
8th February 2024

Scholarship Exam

महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
18th December 2023

Jharkhand NMMS 2023

महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
15th December 2023

Sarthi Exam

महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
7th December 2023

WB NMMS Admit Card 2023

महाराष्ट्र पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
22nd November 2023

Scholarships To Study In UK