Schools

Schools

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

PUBLISH DATE 5th August 2020

दिनांक ५ सप्टेंबर 
शिक्षकदिनानिमित्त.....( कृपया संपूर्ण लेख वाचा )

महाराष्ट्र ही संतांची भूमी समाजसुधारकांची भूमी. समाजात सुधारणा घडवायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे ,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

केवळ पोट भरायची विद्या म्हणजे शिक्षण नव्हे .
नुसते जगायलाच  नव्हे, तर माणसासारखे जगायला शिकवते ते शिक्षण अशी अशी शिक्षणाची साधी व्याख्या करता येईल.

ज्यायोगे व्यक्ती  मधील जाणिवांची जागृती होईल ते शिक्षण. मी ज्या समाजात राहतो त्याने ,माझ्या देशाने मला भरभरून दिले आहे त्यासाठी कृतज्ञतेची जाणीव निर्माण करते ते  शिक्षण. जाणिवा म्हणजेच इतरांना समजून घेण्याची क्षमता. माझे पालक असतील ,माझे समाजबांधव असतील त्यांच्याशी समरस होण्याची, आपल्या आनंदात त्यांना सामील करून घेण्याची आणि त्यांच्या दुःखात सामील होण्याची जाणीव म्हणजे शिक्षण. समानता, बंधुता या पुस्तकातून व भाषणातून परिपूर्ण होत नाही त्यासाठी त्या आचरणात आणायला हव्यात हे शिकविते ते शिक्षण.

शिक्षक एक वृत्ती आहे, शिक्षक एक धर्म आहे, शिक्षक एक भूमिका आहे. जे कार्य खरा सूर्य करू शकत नाही ते कार्य ज्ञानसूर्य करतो. 
काम करताना मी माझ्या शिक्षकांकडून, शिक्षक सहाकार्यांकडून अनेक  गोष्टी शिकलो. शिक्षक विद्यार्थी एक अतूट नाते आहे. त्यामुळे या ठिकाणची ऊर्जा, चैतन्य नवनवीन प्रेरणा देत राहते. राष्ट्र निर्मिती साठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक समाजासाठी आदर्श आहेत. चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि अन्याय , खोटेपणा अनिष्ट गोष्टी यांना विरोध करण्याचा केवळ उपदेश नको. शिक्षकांनी प्रसंगी झळा सोसून सुद्धा आपली भूमिका विषद करण्यासाठी पाय रोवून उभे राहायला हवे. यामध्ये काही वेळा चांगले तर काही वेळा वाईट अनुभव येतातच. अशा वेळी राष्ट्र घडविण्याच्या उद्दिष्टांसाठी प्रयत्नशील रहाताना खडतर व काट्याकुट्याच्या मार्गावरून सुद्धा आनंदने चालत राहू. 

जाणिवेचं ज्ञानात रूपांतर म्हणजे शिक्षण. नवीन शिक्षण पद्धती नुसार फाइव्ह सेन्सेस म्हणजेच बघणे,ऐकणे,रस,स्पर्श गंध या पाच जाणिवा मनुष्याच्या ज्ञानप्राप्तीसाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ कुठल्यातरी वासामुळे कुठेतरी वायर जळाली ईलेक्ट्रिकल इंजिनीयरला कळत .याचे  उत्कृष्ट उदाहरण डॉक्टर विश्वेश्वरय्या देता येईल .  रेल्वेतून प्रवास करताना रेल्वेचा आवाज थोडा बदललेला जाणवला आणि त्यांनी ताबडतोब रेल्वे थांबवली चालकाला आश्चर्य वाटले पुढे काही अंतरावरच रेल्वे रूळ तुटला होता.

"मी आणि माझं" यातून बाहेर काढून आपलं कुटुंब व समाज याकडे बघायला शिकवत ते शिक्षण. मित्रानो ज्या झाडाला जास्त फळ असतात ते झाड जास्त वाकते म्हणजेच जास्त नम्र होते तसेच मनुष्य जसा जास्त विद्यावान होतो तसा जास्त नम्र व संयमी होत राहतो. 

परंतु या कलियुगात काही जण शिक्षकाच्या या सहनशक्तीचा अंत पाहतात. अशावेळी मात्र तो रुद्ररूप धारण करतो. अशा शक्तींशी लढा देताना तो हाल-अपेष्टा सहन करतो परंतु लाचारी व हुजरेगिरी मात्र मान्य करत नाही.

ज्या शिक्षणामुळे विवेक जागृत होतो ते शिक्षण. विवेक म्हणजे चांगले आणि वाईट याच्यातील फरक करण्याची क्षमता. खरं तर ही क्षमता लहानपणापासूनच निर्माण होते पण महाविद्यालयीन जीवनात चांगल्या-वाईटाचं परिमाण ठरतं आणि मग या गोष्टी आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. माझ्यासाठी काय चांगल आहे, माझ्या कुटुंबासाठी काय चांगल आहे, माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी काय चांगल आहे हे हळूहळू मला कळायला हव. 

विचार आणि आचार यात साधर्म्य  साधत ते शिक्षण. In our educational system coordination between theory and practical is education. केवळ जाड ग्रंथांचे वाचन करून आणि मोठ मोठ्या पदव्या घेऊन शिक्षण परिपूर्ण होत नाही. त्याला व्यावहारिकतेची जोड हवी.

विद्या उदंड शिकला 
प्रसंगमान चुकतची गेला
अहो तया अभाग्याला
कोण पुसे !!

भूगोल तज्ञांच्या परिषदेत एक नकाशा अनेक तुकडे करून दिला आणि दहा मिनिटात जोडायच्या होता अनेकांनी ते अवघड असल्याचे सांगितले .एका खेडूताने  मी जोडू का म्हणून विचारले. सगळेजण हसले ,पण त्यांने खरंच तो पाच मिनिटात जोडला. मित्रहो त्या नकाशाच्या मागे एक माणूस होता त्यांनी तो नकाशा उलटा केला आणि माणूस जोडत गेला मग नकाशा आपोआप जोडला गेला. " माणूस जोडला गेला की देश जोडला जातो", हे शिकविणारे  खरे शिक्षण.

आज शिक्षकदिनानिमित्त खास गदिमांची रचना

कुंभारासारिखा गुरु 
नाही रे जगांत  |
वर घालितो धपाटे , 
आत आधाराला हात
॥धृ॥

आधी तुडवी तुडवी, 
मग हातें कुरवाळी |
ओल्या मातीच्या गोळ्याला 
येते रूपाची नव्हाळी |
घडे जाती थोराघरी 
घट जाती राउळांत ॥१॥
कुंभारासारिखा........

कुणी पूजेचा कलश,
 कुणी गोरसाचा माठ |
हात धरितां गुरूने 
ज्याची त्याला लाभे वाट | 
शिष्य पावतो प्रतिष्ठा,
 गुरु राहतो अज्ञात ॥२॥
कुंभारासारिखा........ 
 
- ग.दि.मा.

साधेपणा हे शिक्षणाचं लक्षण. त्यामुळे इतरांचा, त्यांच्या गुणांचा, त्यांच्या ज्ञानाचा आदर करायला शिकवते ते शिक्षण. "याला काय कळते ,त्याला काय कळते", असे कानावर पडले की समजायचं मडकं कच्च आहे.एखाद्या क्षेत्रातील विशिष्ट विषयाची परिपूर्ण ज्ञान म्हणजे शिक्षण. Strive for the perfection. परिपूर्णतेसाठी ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशी अनेक उदाहरणे सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर देता येतील. ही परिपूर्णता मिळवण्यासाठी सर्वांनाच अखंड साधनेची गरज असते. मला सगळं पूर्णपणे कळतं असा भाव  म्हणजेच अपूर्णता व अज्ञान.

ज्ञानाबरोबरच कौशल्य विकसित करत ते शिक्षण महत्त्वाचे. म्हणूनच शासन सुद्धा कौशल्य विकासावर भर देत आहे.आपल्यातल्या कमतरता उणिवा हेरून त्याचे ताकतीत रूपांतर करणे ही किमया साध्य होते शिक्षणामुळेच. We should be able to convert our weaknesses into our strengths.  आवाज योग्य नसल्यामुळे एका उमेदवाराची आकाशवाणीच्या निवेदक पदासाठी नेमणूक झाली नाही. त्याच आवाजाच्या जोरावर त्याने रसिकांच्या मनावर राज्य केले. ही कथा आहे महानायक अमिताभ बच्चन यांची.

आत्तापर्यंत पाहिलेले शिक्षणाचे सर्व आयाम केवळ पुस्तकी ज्ञानातून किंवा केवळ वाचनाने आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ते आयाम आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे आमचे गुरु अर्थातच आमचे शिक्षक  आहेत. शिक्षकांसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. 

तुकाराम महाराज म्हणतात 

तुका म्हणे नाव
जनासाठी उदक ठाव

शिक्षक हा कुंभारासारखा असतो मडकं तयार होताना एका हाताने थापट्या मारतो पण दुसरा हात मात्र मदक्याच्या आत  आधार देत असतो . तो आधार देत असतो. हीच खरी शिक्षकाची भूमिका असते.

आज शिक्षकदिन. आपल्याला घडवणाऱ्या असंख्य शिक्षकांना नम्र प्रणाम.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

डॉ.राधा कृष्णन हे हाडाचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ यां !

आजच्या या कोविडच्या कठीण काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, कामगार अनेक जण जीवावर उदार होऊन आपले योगदान देत आहेत. व्यवहार ठप्प झाल्यामुळे राष्ट्राची क्रयशक्ती घटली आहे. त्यामुळे मानसिक आधार देण्यासाठी, पुनश्च भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरण्यासाठी, श्रद्धा व विश्वास यांच्याद्वारे मनामनामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी शिक्षकाची भूमिका अतिशय महत्वाची आहे.

वर्ष २०२० चे शैक्षणिक सत्र चालू झाले परंतु कोविड १९ मुळे ग्रामीण व शहरी भागातील अजूनही काही विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही, याच बाबीची दाखल घेऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हील संगमनेर, जिल्हा अहमदनगर या विद्यालयाला पुण्यातील प्रा. नीलम कुलकर्णी, प्रा. डॉ. सुजाता काळे, प्रा. हनुमंत ठोंबरे, प्रा. डॉ. सतिदंरजीत कौल या शिक्षकांनी इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२०च्या नवीन अभ्यासक्रमानुसार Physics, Chemistry, Mathematics, Biology या विषयांची पुस्तके भेट दिली. त्यांच्या या कार्याला विद्यार्थी मित्र (VidyarthiMitra.org) कडून सलाम !!!

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
7th April 2024

DMVS Admission 2024

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
30th January 2024

MPSOS Result 2023

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
27th December 2023

NIOS Result 2023 Out

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
22nd June 2023

JNVST Result 2023