Schools

Schools

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू

PUBLISH DATE 21st July 2020

 

बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'टिलीमिली' ही मालिका आजपासून सुरू झाली आहे.

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (एमकेसीएल) ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही 'टिलीमिली' नावाची मालिका सुरू झाली आहे. ही मालिका बालभारतीच्या पाठांवर बेतलेली आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या मालिकेला शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडिओदेखील जारी केला आहे.

ही मालिका सोमवार २० जुलैपासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत प्रसारित केली जाणार आहे. 'टिलीमिली' मालिका बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमातील सर्व पाठांवर आधारित असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कंटाळवाणी वाटणारी व्याख्याने नसतील, विद्यार्थ्यांना परिसरात करून बघता येतील असे कृतिशील शैक्षणिक अनुभव कसे घेता येतील यावर या मालिकेमध्ये माहिती दिली जाणार आहे. ही मालिका २० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या कालावधीत प्रसारित केली जाईल. मालिकेचे एकूण ४८० भाग आहेत. प्रत्येक इयत्तेचा एक पाठ एका भागात असेल. प्रत्येक इयत्तेचे एकूण ६० भाग दाखवण्यात येणार आहेत. रविवार वगळता दररोज सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळात ही मालिका पाहता येईल.

मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील -

वेळ -- इयत्ता

सकाळी ७.३० ते ८.०० -- आठवी

सकाळी ८.०० ते ८.३० -- सातवी

सकाळी ९.०० ते ९.३० -- सहावी

सकाळी ९.३० ते १०.०० -- पाचवी

सकाळी १०.०० ते १०.३० -- चौथी

सकाळी १०.३० ते ११ -- तिसरी

सकाळी ११.३० ते दुपारी १२ -- दुसरी

दुपारी १२ ते १२.३० -- पहिली

एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनला शैक्षणिक कामांचा अनुभव आहे. शिवाय ग्राममंगल या संस्थेचे सहकार्य या मालिकेसाठी घेण्यात आले आहे. ग्राममंगल ही पुण्यातील संस्था आनंददायी अध्ययन-अध्यापनाच्या अनेक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
7th April 2024

DMVS Admission 2024

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
1st April 2024

PSEB 5th Result 2024 Out

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
30th January 2024

MPSOS Result 2023

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
12th January 2024

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
4th January 2024

EMRS Answer Key 2023-24

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
27th December 2023

NIOS Result 2023 Out

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
21st December 2023

JKBOSE 10th Result 2023 Date

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
11th December 2023

TN Half Yearly Examination 2023

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
22nd November 2023

Delhi Nursery Admissions 2024

पहिली ते आठवीसाठी टीव्हीवरीची 'टिलीमिली' शाळा सुरू
22nd June 2023

JNVST Result 2023