मार्गदर्शन प्रशिक्षण
पुणे महानगरपालिका, समाज विकास विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र यांचे संयुक्त सहकार्याने पुणे मनपा हद्दीतील १०० मागासवर्गीय व खुल्या गटातील ५० विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा (UPSC/MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षा) मार्गदर्शन प्रशिक्षण विनामूल्य स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे. याबाबत sdd.punecorporation.org या संकेतस्थळावरती दि. ५-१२-२०२३ ते दि. १९-१२-२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. तथापि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणेकरिता या जाहिरातीस दि. ३-१-२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
sdd.punecorporation.org या संकेतस्थळावर नमूद केलेल्या नियम व अटीनुसार आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अर्ज भरण्यात यावा. सदर योजनेविषयीची सविस्तर माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आली आहे. (अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे व दोन पासपोर्ट साईज फोटो जोडून अर्ज व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, शिवाजी व्यायाम मंडळासमोर, शिवाजीनगर, पुणे-०५ येथे दि. ३-१-२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावा.)
पुणे मनपा हद्दितील मागासवर्गीय व खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरीता विनामुल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण विद्यार्थी प्रवेश करीता नियम व अटी
१. मागासवर्गीय (SC/ST/NT) व खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे.
२. कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत
आवश्यक) तसेच ३ वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा
लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा इ. जोडावे.
३. शैक्षणिक पात्रता- पदवी/पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्ण आवश्यक. (प्रमाणपत्र व गुणपत्रक सोबत जोडणे आवश्यक.)
४. वय मर्यादा- MPSC / UPSC करीता वय मर्यादा खालील तक्यात दर्शविणेत येत आहे.
Category MPSC UPSC
SC. ४३ ३७
ST ४३ ३७
NT. ३८ ३५
Open ३८ ३२
(वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला/ ससून हॉस्पिटल येथील वयाबाबतचा दाखला, शाळेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचा दाखला इ. एक आवश्यक)
५. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय (SC/ST/NT) गटातील व खुल्या गटातील विद्यार्थ्यां ना कुटूंबाचे
सर्व मार्गांने मिळणारे उत्पन्न मर्यादा करीताची अट राहणार नाही.
६. जातीचा दाखला विद्यार्थी मागासवर्गीय (SC/ST/NT) असल्यास जातीचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
७. सर्व कागदपत्रे ही साक्षांकित करूनच अर्जासोबत जोडावी.
८. दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
९. प्रवेश घेते वेळेस अनामत रक्कम रू. १०००/- चलनाने पुणे मनपाकडे जमा करावी लागेल व झाल्यावर सदरची रक्कम अदा केली जाईल. प्रशिक्षण पूर्ण
१०. प्रशिक्षणकरीता प्रवेश घेते वेळेस उपरोक्त अटी विषयक सर्व मूळ कागदपत्रे दाखविणे बंधनकारक राहील.
११. प्रशिक्षणकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम पुणे महानगरपालिकाकडे जमा करतेवेळेस ऑनलाईन अर्जाचे प्रिन्ट सह (सर्व कागदपत्रे ही साक्षांकित करणेत येवून) अर्जासोबत जोडावीत व अर्ज व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. ७२१, शिवाजीनगर गावठाण, शिवाजी व्यायाम मंडळासमोर, शिवाजीनगर, पुणे-०५ येथे जमा करावा.
१२. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कालावधी एक वर्षाचा असणार आहे. लाभार्थ्यास जास्तीत जास्त दोन वेळा या योजनेचा लाभ घेता येईल.
१३. अर्ज स्विकारण्याचा / नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका यांच्याकडे राहील.
अधिक माहितीकरिता संपर्क : श्री. संदीप कोळपे, सहाय्यक समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे ४११००५. संपर्क क्र.: (०२०-२५५३०५५० व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, प्लॉट नं. ७२१, शिवाजीनगर गावठाण, शिवाजी व्यायाम मंडळासमोर, शिवाजीनगर, पुणे- ०५.)
-------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
ISC Date Sheet 2025 Out
Pariksha Pe Charcha
Time Management
ICSI CS Executive, Professional June Exam Date Sheet Released
Registrations Ongoing For Pariksha Pe Charcha 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या पुढील वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक घोषित
BPSC TRE 2.0 Exam Dates
CAT 2023: Important Topics To Look Out For Last-Minute Preparation
JEE Main 2024: When should I start giving mock tests?
Tamil Nadu Half Yearly Exam Dates Announced For Class 6 To 12
Biology at Glance
Dealing with Biology chapters 3 , 4 and 12
How to study 12th Physics: New Syllabus- 2020
Chemistry: Halogen derivatives MCQ
How to prepare for Physics subject
Biology- How to score more marks
Biology Ch-2: MHT-CET & NEET Preparation 2021-22
How to Study English subject
Biology Ch-1: MHT-CET & NEET Preparation 2020-21