Exam Preparation 2020-21

Exam Preparation 2020-21

How to study 12th Physics: New Syllabus- 2020

PUBLISH DATE 7th October 2020

फिजिक्स चा अभ्यास कसा करावा

भौतिक शास्त्र किंवा फिजिक्स म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे आपले चौकस दृष्टीने बघणेका व कसे किंवा कशामुळे असे प्रश्न निर्माण होणे, व अर्थातच त्याचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करणे. 

फिजिक्सच्या अभ्यासाची भीती न बाळगता, त्यातल्या संज्ञा किंवा संकल्पना समजून घेतल्या तर अभ्यास करणे सोपे होईल.

संकल्पना समजल्या तरी त्या आठवायचा प्रयत्न केल्यास त्या आठवत नाहीत म्हणून त्या न बघता लिहून काढणे (किमान तीन वेळा) ह्याला पर्याय नाही.

पेपर पॅटर्न प्रमाणे पहिला प्रश्न M.C.Q. चा 10 मार्कचा असतो. त्यासाठी अर्थातच सर्व संकल्पना समजल्या पाहिजेत. काही वेळा नववी दहावी अकरावी येथील संकल्पना पण माहित असाव्या लागतात. काही छोटे न्यूमरिकल प्रॉब्लेम पण असतात, त्यासाठी फॉर्मुला पाठ असल्या पाहिजेत.

 अभ्यास करताना चार टप्पे किंवा पायऱ्या.

1- संज्ञा संकल्पना समजून घेणे मग Definitions, Laws किंवा त्याची Statements लिहून काढणे.

2- आपल्याला ती समजलेली असतात पण लिहिताना दोन-चार शब्द विसरले जातात. तर प्रत्येक शब्दाला तिथे महत्त्व असते.

For Example-

Moment of inertia of a rigid body about an axis of rotation is defined as the sum of product of the mass of each particle and the square of the perpendicular distance from the axis of rotation.

 वरील डेफिनेशन मध्ये प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे उदाहरणार्थ rigid body

3- डेरिवेशन असतात ती सुद्धा समजून घेऊन मग ते लिहून बघणे. त्यात पुन्हा प्रत्येक स्टेपला मार्क असतो. मधल्या स्टेप्स गाळून एकदम शेवटची स्टेप लिहिली तर पूर्ण मार्क मिळत नाहीत.

4- जे Derive करायचे असते ते Law Statements प्रथम लिहावे, मग Labeled Diagram आणि त्याचे Explanation आणि मग Derive करावे.

5- फक्त मॅथेमॅटिकल स्टेप्स लिहिल्या तर निम्मेच मार्क्स मिळतील.

 For example - To prove Gauss theorem

1 -statement 2-label diagram

3-explanation 4-proof

4- न्यूमरिकल सोडवताना प्रथम फॉर्मुला लिहावा. मग त्या फॉर्मुला मध्ये प्रॉपर युनिटमध्ये Substitution करणे( इथे युनिट एकाच सिस्टीम मधील पाहिजेत S.I OR CGS).

 सर्वसाधारणपणे सर्व SI सिस्टीम मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावे आणि मग त्या पुढचे सोडवावे.

Logarithmic टेबल्स ची माहिती व त्याची सवय पाहिजे ती कॅलक्युलेशन्स बाजूला tabular form मध्ये दाखवली पाहिजेत उत्तर लिहिताना उत्तर बरोबर units मध्ये पाहिजे.

आता आपण थोडक्यात पुढीलप्रमाणे लक्षात ठेवूया.

  1. धडा नीट पूर्णपणे समजून घेणे
  2. डेफिनेशन पाठ करून दोन-तीन वेळा लिहून बघणे
  3.  डेरिवेशन्स न बघता लिहून काढणे
  4. सर्व डायग्राम labeling सहित काढणे
  5.  धड्यातील सर्व गणिते (किमान दहा) स्वतःहून सोडून बघणे

Written By : Prof. Mrs. Jogalekar Vaijayanti

Lecturer of Physics (Ex)

Abasaheb Garware College,  Pune

 

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.