Higher Education

Higher Education

उच्च शिक्षणाची संधी

PUBLISH DATE 6th June 2024

उच्च शिक्षणाची संधी.

सकाळ इंडिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती; २५ जूनपर्यंत करा अर्ज,

 उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ची २०२४-२५ या वर्षासाठी  शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठीचे अर्ज २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना भरावे लागतील. तसेच, भारतात पीएच. डी. करण्यासाठी किंवा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीही शिष्यवृत्ती मिळू शकते.

'सकाळ इंडिया फाउंडेशन ने शैक्षणिक कार्यामधील आपला ६० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास २०१९-२०मध्ये पूर्ण केला आहे. 'सकाळ इंडिया फाउंडेशन'तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. फाउंडेशनचे हे ६५वे वर्ष आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून १ लाख रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. त्याप्रमाणे भारतात पीएचडी' करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना

प्रत्येकी १ लाख रुपये, अशा ५० शिष्यवृत्त्या देण्यात येतील. ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठो (२०२४- २५) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र मिळाले असेल किंवा ज्या पदवीधरांना संशोधन संस्थेमध्ये 'पीएच. डी. 'च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०२२ किंवा त्या पूर्वीचे विद्यापीठाचे, राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील.

बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झालेल्या विद्याध्यर्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड २ वर्षांत किंवा त्या आधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर किंवा 'पीएच. डो. चे शिक्षण घेणाऱ्या तसेच पात्रता अट पूर्ण करणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांस १० हजार रुपये परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर फ केले जातील. विद्यार्थी फाउंडेशनच्या खालील वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात. वेबसाइट www. sakalindiafoundation.com या वेबसाइटवर शिष्यवृत्तीचे अर्ज २५ जूनपर्यंत उपलब्ध असतील.

पोलिस पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

■ 'सकाळ इंडिया फाउंडेशन'ने सुवर्णमहोत्सवी वर्षापासून (२००९- १०) कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठीदेखील शिष्यवृत्ती सुरू केली आहे. बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी काही जागा या मुलांसाठी राखीव आहेत. तरी ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठातील प्रवेश झाल्याचे पत्र मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांनी 'केळकर शिष्यवृत्तीसाठी' अर्ज करावा, असे आवाहन सकाळ इंडिया फाउंडेशनने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

सकाळ इंडिया फाउंडेशन, सकाळ ऑफिस बिल्डिंग, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२.

संपर्क क्रमांक: ०२०६६०३५९३५

ई-मेल: contactus@sakalindiafoundation.org/ sakalindiafoundation@esakal.com.

 

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


उच्च शिक्षणाची संधी
5th September 2024

IIM Admission Process

उच्च शिक्षणाची संधी
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

उच्च शिक्षणाची संधी
29th August 2024

AP BArch Admissions 2024

उच्च शिक्षणाची संधी
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

उच्च शिक्षणाची संधी
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

उच्च शिक्षणाची संधी
26th August 2024

DU UG Admission 2024

उच्च शिक्षणाची संधी
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

उच्च शिक्षणाची संधी
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

उच्च शिक्षणाची संधी
22nd August 2024

DU Admissions 2024

उच्च शिक्षणाची संधी
2nd August 2024

DU UG Admission 2024

उच्च शिक्षणाची संधी
20th July 2024

CDAC C-CAT 2024 rank out