Higher Education

Higher Education

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग

PUBLISH DATE 31st July 2024

बारावीनंतर अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीला पसंती देतात. अभियांत्रिकी क्षेत्रात होणारे संशोधन व तंत्रज्ञान विकासामुळे नवनवीन शाखा उदयास येत आहेत. सध्याच्या काळात Artificial Intelligence, Data Science, Robotics & Automation, Machine Learning, cyber security, Mechatronics अशा अनेक शाखांतून चांगले करिअर होऊ शकते. महाविद्यालय निवडताना त्या त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली माहिती वाचावी आणि तपासून पाहावी. नॅकची मान्यता, पायाभूत सुविधा, प्राध्यापक वर्ग, कॅम्पससाठी तयारी करून घेणारे ट्रेनिंग प्रोग्राम, कँपससाठी येणाऱ्या कंपन्या, नोकऱ्या यांची माहिती घ्यावी.

महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमा, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आणि इतर शाखांच्या प्रवेशांची प्रक्रिया राबविली जाते. याविषयीची माहिती www.dtemaharashtra@gov.in किंवा cetcell.mahacet.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. महत्त्वाच्या शाखा -

कॉम्प्युटर/माहिती तंत्रज्ञान

अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेमध्ये संगणक अभियांत्रिकीची माहिती गरजेची असते. या शाखेमध्ये हार्डवेअर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, मोबाईल टेक्नॉलॉजी, प्रोग्रागिंम लँग्वेजेस, कॉम्प्युटर असेंब्ली, इंटरनेट टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ग्राफिक्स, डिझाइन, अ‍ॅनिमेशन इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा या विषयांचा अंतर्भाव असतो. माहिती तंत्रज्ञानामुळे बायोइन्फॉर्मोटिक्स, रिमोट सेन्सिंग, अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी अशा अनेक विद्या शाखा उदयास येत आहेत.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

भविष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यातल्या छोट्या कामात एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. या क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी आहेत. मशिन लर्निंग, डीप लर्निंग, एनएलपी सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भविष्यात सुमारे ३३ टक्के संधी उपलब्ध होतील.

डेटा सासन्स

एखादा व्यवसाय अथवा ॲप्लिकेशन सुरू असताना तयार होत जाणाऱ्या माहितीचा वापर करून त्या व्यवसायास अथवा ॲप्लिकेशनला वृद्धिंगत करणे म्हणजे डेटा सायन्स. डेटा सायंटिस्टची गरज सर्वच क्षेत्रात आहे आणि असणार आहे. औषधनिर्मिती उद्योगात औषधाची परिणामकारकता व बँका त्यांची उधरीची जोखीम (क्रेडिट रिस्क) ठरवण्यासाठी गेली ४० वर्षे डेटा सायन्सचा वापर करत आहेत. वर्तमान काळात, ई- व्यवहाराची चलती आहे. तसेच भविष्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स अतिशय महत्त्वाचे आहे.

सायबर सिक्युरिटी

नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांच्यात वाढ होत असल्याने सायबर सुरक्षेचे महत्त्वही वाढले आहे. सायबर सुरक्षा म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटा यांसारख्या इंटरनेट-कनेक्टेड सिस्टिमचे सायबर धोक्यांपासून संरक्षण करणे. संगणक, मोबाईल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यांचा समावेश होतो. आरोग्यसेवा, छोटे व्यवसाय, सरकारी संस्था, उत्पादन, वित्तीय संस्था, शिक्षण यांनाही आपला डेटा गोपनीय ठेवण्यासाठी सायबर सुरक्षेची गरज लागते.

ई.एन.टी.सी.

माहिती, तंत्रज्ञानाच्या या युगात सर्वांत झपाट्याने वाढवणारी अभियांत्रिकीची शाखा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन (ई.एन.टी.सी.). लिनिअर इंटिग्रेटेड सर्किट्स, सॅटेलाइट कम्युनिकेशन, रोबोटिक्स, मायक्रोप्रोसेसर या प्रमुख विषयांचा अभ्यास या शाखांमध्ये केला जातो. आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असणारी शाखा. यामधे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, व्हिडिओ इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड पॉवर अशा शाखांचा विकास या क्षेत्रात झाला आहे.

इलेक्ट्रिकल

सध्याच्या काळात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी खूप वाढली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक अभियंत्यांना मोठी मागणी आहे. इलेक्ट्रिकल अभियंते वस्तूंची उत्पादने, इलेक्ट्रिकल सिस्टिमचे संशोधन, डिझाइन आणि चाचणी करतात. बांधकाम आणि सेवा, वाहतूक, उत्पादन, रोबोटिक्स, दूरसंचार, ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसह अनेक उद्योग आणि क्षेत्रामध्ये समाविष्ट होऊ शकतात. ऊर्जा शोध, वीजनिर्मिती, वीजवापर, वितरण, नियंत्रण, केंद्र उभारणी, व्यवस्थापन या विद्युतविषयक बाबींचा यात समावेश आहे. रेखाटन, विद्युत प्रवाह मोजणी, विद्युत उपकरणनिर्मिती, सुरक्षा व्यवस्थापन इत्यादी विषयदेखील विद्युत अभियांत्रिकीमध्ये समाविष्ट असतात.

केमिकल इंजिनिअरिंग

आजच्या काळात पेट्रोलियम, पेट्रोकेमिक, पॉलिमर, प्लास्टिक, बायोकेमिकल आणि बायोटेक्नॉलॉजी ही क्षेत्रे आघाडीवर आहेत. ही सर्वच क्षेत्रे केमिकल इंजिनिअरिंगशी निगडित आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे उत्पादन व निर्मिती असो की, सर्व प्रकारचे औषधे, साबण, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एलपीजी, गॅस, अल्कोहोल, खते, कीटकनाशके, पेंट्स, ग्रीस, कपडे, कागद, रबर, फायबर, प्लास्टिकच्या वस्तू, टूथपेस्ट, परफ्युम्स, इत्यादी वस्तू केमिकल इंजिनिअरिंगच्या साह्याने तयार होते. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

याशिवाय पेट्रोलियम इंजिनिअरिंग, एरोस्पेस, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल, इन्स्ट्रुमेंटेशन, इन्व्हार्न्मेंटल, ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल, प्लास्टिक, प्रिंटिंग, फूड टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी अशा अनेक शाखा अभियांत्रिकीमध्ये उपलब्ध आहेत. या बदलांकडे जागरूकतेने लक्ष देऊन आपली आवड ओळखली, तर आपण योग्य शाखेची निवड करून चांगले भविष्य घडवू शकतो.

(लेखक डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी येथे प्रवेश प्रक्रिया प्रमुख आहेत.)

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
27th November 2024

AILET 2025 Admit Card Released

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
18th November 2024

AILET 2025 Application

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
28th October 2024

ICAI Result 2024 Date

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
7th October 2024

CBSE Date Sheet 2025

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
3rd October 2024

MAH CET 2024 Admission

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
21st September 2024

BTech in AI vs BTech in CSE

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
21st September 2024

AIBE 19 registration underway

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
16th September 2024

SSUHS GNM Result 2024 Released

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
14th September 2024

TS ICET counselling 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
12th September 2024

DU UG Admission 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
12th September 2024

UPTAC Counselling 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
11th September 2024

FMGE December 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
10th September 2024

RTMNU Admission 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
5th September 2024

IIM Admission Process

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
29th August 2024

AP BArch Admissions 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
26th August 2024

DU UG Admission 2024

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

अभियांत्रिकी : करिअरचा राजमार्ग
22nd August 2024

DU Admissions 2024