Higher Education

Higher Education

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण

PUBLISH DATE 28th August 2024

जर्मनीला जाण्याची इच्छा असलेल्या कुशल कामगारांना मोफत जर्मन भाषा शिकवण्यासाठी राज्य सरकारने नुकताच एक करार केला आहे. त्याचा फायदा कुशल कामगारांना होणार आहे.

जर्मनीला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या करारानुसार जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना सरकारकडून मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तर पुण्यामध्ये १० आणि मुंबईमध्ये सर्वाधिक १५ केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. या प्रशिक्षण वर्गाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे. आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात राज्य सरकारने जर्मनीमधील बाडेन बुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार चार लाख कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून बाडेन- बुटेनबर्ग राज्याला १० हजार कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. मात्र, हे कौशल्य असलेल्या उमेदवारांना जर्मन भाषेचा अडथळा येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जर्मन भाषा शिकविण्यासाठी पुण्यातील गोथे इन्स्टिट्यूट आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यात करार झाला. या करारांतर्गत उमेदवारांना भाषेसह तेथील कार्यसंस्कृतीचे ज्ञान देण्यात येणार आहे.जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईमध्ये सर्वाधिक १५, तर पुण्यामध्ये १० प्रशिक्षण केंद्रे, तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच प्रशिक्षण केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. हे प्रशिक्षण निःशुल्क असणार आहे. राज्य सरकारमार्फत जर्मनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करण्याबरोबरच उमेदवारांना पारपत्र काढण्यासाठीही सहकार्य करणार असल्याची माहिती प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी दिली. 

पात्र कोण ?

करारानुसार ठरलेल्या ३० क्षेत्रांमधील अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाले असेल किंवा अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेली व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहे.

नोंदणी कुठे करायची ?

अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) https:// www.maa.ac.in/GermanyEmplo yement या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. या उपक्रमाची अधिक माहिती प्राप्त करू शकतात. लिंकवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

उमेदवारांची कौशल्यवृद्धी

बाडेन-बुटेनबर्ग 3 आणि महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी, तसेच गरज पडल्यास क्षेत्रनिहाय कौशल्यवृद्धीसाठी युवकांना सरकारकडून मोफत कौशल्यवृद्धीचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून, त्याचा खर्च सरकार उचलणार आहे.

शालेय शिक्षकांनाही प्रशिक्षण

नोंदणी केलेल्या युवकांना जर्मन भाषा शिकविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई जिल्ह्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील जर्मन भाषा शिकविण्याची आवड असलेल्या नियमित शिक्षकांनी https://forms.gle/1Q32 ByNwp9MnHmHc7 या लिंकवर नोंदणी करावी. त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.

 


Related News


जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
16th September 2024

SSUHS GNM Result 2024 Released

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
14th September 2024

TS ICET counselling 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
12th September 2024

DU UG Admission 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
12th September 2024

UPTAC Counselling 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
11th September 2024

FMGE December 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
10th September 2024

RTMNU Admission 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
5th September 2024

IIM Admission Process

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
29th August 2024

AP BArch Admissions 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
26th August 2024

DU UG Admission 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
22nd August 2024

DU Admissions 2024

जर्मनीमध्ये रोजगारासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना भाषेचे मोफत प्रशिक्षण
2nd August 2024

DU UG Admission 2024