Higher Education

Higher Education

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!

PUBLISH DATE 25th May 2024

एक काळ होता, जेव्हा बारावीत ७०-७५ टक्के मिळाले तरी डीएडला नंबर लागत नव्हता. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना फिरावे लागायचे. अर्ज स्वीकृतीच्या खिडक्यांजवळच रात्र काढणारे विद्यार्थी तेव्हा दिसायचे. आता चित्र बदलले. शिक्षक भरती नियमित होत नसल्याने डीएडचे महत्त्व ओसरले. म्हणून बारावीत ४५ टक्के मिळाले तरी आता डीएडला प्रवेश मिळू शकतो.

बारावीच्या निकालानंतर आता डीएड प्रवेशाला सुरवात झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून (एससीईआरटी) ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. ‘एससीईआरटी’च्या संकेतस्थळावरून अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ‘डीएड’ची ३४ महाविद्यालये आहेत. त्यात शासकीय ३, अनुदानित १ व खासगी विनाअनुदानित २८ महाविद्यालये आहेत. शिक्षक होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणी प्रवेश घेता येणार आहे.

अनुदानित महाविद्यालयाचे वार्षिक शैक्षणिक शुल्क तीन हजार रुपये तर खासगी महाविद्यालयांचे वार्षिक शुल्क १२ ते २० हजारांपर्यंत आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडावा लागणार आहे. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि त्यानंतर टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहेत. त्यासाठी पहिल्या फेरीत विद्यार्थ्याला कोणते महाविद्यालय मिळाले, त्याचा मेसेज ‘ई-मेल’द्वारे पाठविला जाणार आहे.

ठळक बाबी

‘डीएड’साठी विद्यार्थ्यांना ‘एससीईआरटी’च्या संकेतस्थळावरून करता येतील अर्ज

खुल्या प्रवर्गासाठी ४९.५० तर मागासवर्गीयांसाठी ४४.५० टक्क्यांची अट

अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रतिवर्षी तीन तर खासगीचे शुल्क १२ ते २० हजारांपर्यंत

जिल्ह्यात शासकीय तीन, अनुदानित एक तर विनाअनुदानित २८ अशी ३४ महाविद्यालये

अशी आहे सद्यःस्थिती

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४९.५० टक्के गुणांची अट आहे. तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ४४.५० टक्के गुणांची मर्यादा आहे. ‘डीएड’साठी मागील काही वर्षांपासून विद्यार्थी मिळत नाहीत, हजारो जागा रिकाम्या राहत असल्याने अनेक महाविद्यालयांना टाळे लावावे लागले आहे. जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. तथापि, दोन वर्षांपासून शिक्षक भरती होत असल्याने यंदा 'डीएड'साठी क्षमतेच्या प्रमाणात प्रवेश मिळतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
5th September 2024

IIM Admission Process

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
29th August 2024

AP BArch Admissions 2024

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
26th August 2024

DU UG Admission 2024

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
22nd August 2024

DU Admissions 2024

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
2nd August 2024

DU UG Admission 2024

बारावीत ४५ टक्के मिळाले, घेऊ शकता डीएडला प्रवेश!
20th July 2024

CDAC C-CAT 2024 rank out