Higher Education

Higher Education

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍

PUBLISH DATE 27th June 2024

Dr. Homi Bhabha University

बीए मानसशास्त्रला विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी मोठा कल समोर आला आहे. तसेच एमए मानसशास्त्र (अप्लाईड सायकॉलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता ही २० जागांची आहे.

मुंबई : ज्ञान, तंत्रज्ञानाच्या जगात मानसिक शांतता आणि त्याचे मोठे प्रश्न निर्माण झाले असून प्रत्येक क्षेत्रात समुपदेशक आणि त्याची मोठी निकड निर्माण झाली आहे. याच मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात (Dr. Homi Bhabha State University) बीए मानसशास्त्र पदवीच्या (BA Psychology Degree) अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. यामुळे या विद्यापीठात बीए मानसशास्त्र या विषयाच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून आला आहे.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी, पदव्युत्तरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश‍ प्रक्रिया सुरू आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत नामांकित महाविद्यालयांमध्ये नोंद असलेल्यांपैकी एलफिन्स्टन महाविद्यालय आणि सिडनॅहम महाविद्यालयांसोबत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही महाविद्यालये येतात.

यात विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया ही वेगात सुरू असून यात बीए मानसशास्त्र या अभ्यासक्रमासाठी १२० प्रवेश क्षमता असताना विद्यार्थ्यांची अधिक मागणी वाढल्याने या प्रवेशासाठी तब्बल २७० हून अधिक विद्यार्थ्याानी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज करणाऱ्यांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामुळे ही मागणी अधिक वाढल्यास विद्यापीठाला या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत अधिक वाढ करण्याची गरज निर्माण होणार असल्याचेही सांगण्यात येते.

समुपदेशक होण्याची संधी

बीए मानसशास्त्र आणि एमए मानसशास्त्र हे पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विषयांत देशात आणि जगभरात संशोधनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, शिवाय तातडीने समुपदेशक होण्यासाठी हे अभ्यासक्रम महत्वाचे ठरणार आहेत.

बीए मानसशास्त्रला विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी मोठा कल समोर आला आहे. तसेच एमए मानसशास्त्र (अप्लाईड सायकॉलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता ही २० जागांची आहे. मात्र या प्रवेशासाठी देखील १२४ हून अध‍िक विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसतोय.

डॉ. विलास पाध्ये, कुलसचिव, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

ज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना मानसिक शांतता आणि त्यासंबंधीचे आरोग्य जपण्यासाठी समुपदेशक आदींची मोठी निकड निर्माण झाली आहे. यामुळे विद्यापीठातील हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रभावी असे अभ्यासक्रम सुरू असून विद्यापीठाचे हे उच्च शिक्षणातील पुढचे पाऊल ठरणार आहे.  डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
5th September 2024

IIM Admission Process

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
29th August 2024

AP BArch Admissions 2024

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
26th August 2024

DU UG Admission 2024

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
22nd August 2024

DU Admissions 2024

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
2nd August 2024

DU UG Admission 2024

डॉ. होमी भाभा विद्यापीठात बीए मानसशास्त्र अभ्यासक्रमाकडे मोठा कल‍
20th July 2024

CDAC C-CAT 2024 rank out