Higher Education

Higher Education

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?

PUBLISH DATE 4th June 2024

अहमदनगर - तुम्ही अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहात का? या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत तुम्ही असाल तर, तर तुम्ही प्रवेशाची पूर्वतयारी केली आहे का? होय, तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असाल, तर आतापासूनच प्रवेशाची पूर्वतयारी करणे आवश्‍यक आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा कक्षातर्फे ‘सीईटी’ परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश परीक्षांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जातात.

दरम्यान, प्रत्यक्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व कागदपत्रे परीक्षा कक्षांच्या संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावी लागतात. त्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना संबंधित प्रवेश नियमावलीत नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन ती तयार ठेवावीत, अशी सूचना तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थी आणि पालकांना केली आहे.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यास खुल्या प्रवर्गातून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा विचार केला जातो आणि त्यानुसार प्रवेशासाठी निवड यादी जाहीर केली जाते. त्यामुळे कागदपत्रे प्राप्त करून ठेवावीत, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.

खोटी कागदपत्रे सादर झाल्यास ‘फौजदारी’

‘शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून न घेता बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे पडताळणीदरम्यान आढळून आले होते. अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांकडूनच प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावी. बनावट अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल,’ असे राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जात/जमात प्रमाणपत्र

  • जात/जमात वैधता प्रमाणपत्र

  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

  • अधिवास प्रमाणपत्र

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र

  • दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र

तंत्रशिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणारे व्यावसायिक अभ्यासक्रम

  • पदविका : अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, वास्तूकला, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी

  • पदवी : अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, वास्तुशास्त्र, बी. प्लॅनिंग, बी. डिझाईन, बीबीए/बीएमएस/ बीबीएम, बीसीए.

  • पदव्युत्तर पदवी : एम.ई/एम.टेक, एम.फार्म, फार्म. डी, एम. आर्किटेक्चर, एम. प्लॅनिंग, एम.एचएमसीटी, एमबीए/एमएमएस, एमसीए, तसेच संलग्न एकात्मिक अभ्यासक्रम (इंटिग्रेटेड)

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ

https://www.dte.maharashtra.gov.in

https://cetcell.mahacet.org

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
5th September 2024

IIM Admission Process

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
29th August 2024

AP BArch Admissions 2024

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
26th August 2024

DU UG Admission 2024

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
22nd August 2024

DU Admissions 2024

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
2nd August 2024

DU UG Admission 2024

Degree Admission : तुम्ही प्रवेशासाठी पूर्वतयारी केलीय का?
20th July 2024

CDAC C-CAT 2024 rank out