Higher Education

Higher Education

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी

PUBLISH DATE 29th June 2024

Polytechnics: दहावीनंतर कमी कालावधीत रोजगार देणारा अभ्यासक्रम म्हणून पॉलिटेक्निकची (तंत्रशिक्षण) ओळख आहे. पुढे अभियंता होण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम पर्याय मानला जातो. तीन वर्षांनंतर नोकरीची संधी मिळत असल्याने विद्यार्थी आणि पालकांची या अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती मिळते. पण, पॉलिटेक्निक शिक्षण घेण्यासाठी योग्य विषय निवडणे महत्त्वाचे असते. उत्तम करिअरच्या दृष्टिकोनातून संधी असणारे काही प्रमुख विषय आहेत. या विषयांत पदवी प्राप्त केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

तंत्रनिकेतनमध्ये दहावीनंतर तीन वर्षांच्या कालावधित कोणत्याही ज्ञानशाखेतून अभियांत्रिकी पदविका मिळवता येते. तंत्रनिकेतनमध्ये कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, आयटी, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन्स, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, केमिकल, एरोनॉटिकल, बायोमेडिकल, मरिन टेक्नॉलॉजी, माइन टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, रबर टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चरल असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

हे अभ्यासक्रम साधारणपणे तीन वर्षांचे असतात. या अभ्यासक्रमानंतर उच्चशिक्षणासाठी जाण्याची इच्छा असल्यास त्याच ब्रँचमध्ये लगेच द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमाचे विशेष महत्त्व म्हणजे, कौशल्याधारित व सोबतच थिअरी अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन मिळून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांच्या शेवटी कॅम्पसमधून विद्यार्थ्यांची निवड औद्योगिक आस्थापनामध्ये शिकवू उमेदवार लगेच केली जाते. सध्या राज्यात शासकीय तंत्रनिकेतन, सिपेट, नाइलेट यासह अनेक खासगी तंत्रनिकेतन उपलब्ध आहेत. यावर्षीपासून पॉलिटेक्निकमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, मेका ट्रॉनिक्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स ऑटोमेशन, आयओटी असे नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

महत्त्वाच्या कोर्स आणि त्यातील संधी

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ः प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी संधी. डिजिटल इंडस्ट्रीमध्ये मागणी वाढत आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) ः तंत्रज्ञानातील अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे एआय. या अभ्यासक्रमाला भविष्यात बहुतांश क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध राहणार आहेत. या अभ्यासक्रमाकडे तरुणांचा कलही मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन :

मोबाइल नेटवर्क, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात संधी आहे. यासह विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत.

रोबोटिक्स ऑटोमेशन ः उद्योग उत्पादन, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स, स्वास्थ्य सेवा, कृषी तंत्रज्ञान अशा विविध खासगी व सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी.

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ः महावितरण, वीज निर्मिती, इलेक्ट्रिकल उपकरणांच्या डिझाइनमध्ये संधी असते. यासह सरकारी आणि खासगी क्षेत्रात भरपूर मागणी. सध्या इलेक्ट्रिकल मोटार, बाइक्स, स्कूटर येत असल्याने भविष्यात या विषयाला मागणी वाढतच राहणार आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग : उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये नोकरीची संधी आहे. यासह विविध प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.

सिव्हिल इंजिनिअरिंग : बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये संधी आहे. सरकारी व खासगी क्षेत्रात चांगल्या नोकरीच्या संधी.

डाटा सायन्स ः डेटा सायंटिस, डेटा ॲनालिस्ट, बिझनेस इंटेलिजेन्स डेव्हलपर, डेटा इंजिनिअर, मशीन लर्निंग इंजिनिअर, डेटा आर्किटेक्ट, बिग डेटा स्पेशालिस्ट, ॲनालिटिक्स मॅनेजर, मार्केटिंग, स्वास्थ्यसेवा अशा विविध क्षेत्रात नोकरीची संधी. डेटा सायन्समुळे व्यवसायांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत मोठी मदत होणार आहे. हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे यात मोठ्या नोकऱ्यांच्या मोठी संधी राहणार आहे.

इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ः सॉफ्टवेअर, नेटवर्किंग आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रात संधी आहे. आयटी क्षेत्रातही भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध.

ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग : ऑटोमोबाइल डिझाइन, उत्पादन आणि मेंटेनन्समध्ये संधी. ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी.

नेमके काय करावे?

विद्यार्थ्यांना ज्या संस्थेत पॉलिटेक्निक शिक्षण घ्यायचे आहे, त्या संस्थेची गुणवत्ता, उपलब्ध संसाधने तपासावेत.

इंटर्नशिप आणि प्लेसमेंट संधी : ज्या संस्थेत इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या उत्तम संधी आहेत, अशा संस्थेची निवड करावी.

विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड आणि क्षमतांचा विचार करून विषय निवडावा.

उद्योगातील ट्रेंड आणि मागणी तपासून कोणत्या क्षेत्रातील मागणी आहे, हे तपासून पाहावे.

शिकावी नवनवीन कौशल्ये

पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमात उत्तम गुणवत्ता मिळविल्यास नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे स्वतःला विविध तंत्रज्ञान व प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह करत राहावे. सतत नवनवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न केल्यास कौशल्य विकसित होईल.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
5th September 2024

IIM Admission Process

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
5th September 2024

AYUSH NEET UG Counselling 2024

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
29th August 2024

AP BArch Admissions 2024

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
26th August 2024

AP EAMCET 2024 Counselling

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
26th August 2024

ICSI CS June 2024 Result

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
26th August 2024

DU UG Admission 2024

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
24th August 2024

NEET PG 2024 Result Declared

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
23rd August 2024

Top 5 Engineering Colleges

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
22nd August 2024

DU Admissions 2024

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
2nd August 2024

DU UG Admission 2024

पॉलिटेक्निकमध्ये करिअरच्या विविध संधी
20th July 2024

CDAC C-CAT 2024 rank out