UGCNET & SET

UGCNET & SET

यूजीसी नेट परीक्षा २०२१: अॅप्लिकेशन करेक्शन विंडो खुली

PUBLISH DATE 8th September 2021

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)ने यूजीसीच्या जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा दिला आहे. या उमेदवारांना केलेल्या अर्जामध्ये सुधार करण्याची संधी मिळणार आहे.

एनटीएतर्फे यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांनी UGC NET परीक्षेच्या दोन्ही फेऱ्यांसाठी अर्ज केले आहेत आणि त्यामध्ये त्रुटी आढळल्यास अर्जात सुधारणाकरता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic वर जावे लागेल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. यूजीसी नेट अर्ज दुरुस्तीची विंडो १२ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत खुली राहील.

UGC NET अर्ज दुरुस्तीसंदर्भात NTA ने जारी केलेल्या सूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज शुल्कासह यशस्वीरित्या आपला अर्ज भरलाय फक्त त्या उमेदवारांना अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाते. तसेच, उमेदवारांना अर्ज दुरुस्तीसाठी शुल्क देखील भरावे लागणार आहे. उमेदवारांना हे शुल्क ऑनलाइन माध्यमातून (डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, पेटीएम वॉलेट इ.) द्वारे भरता येईल. अंतिम तारखेनंतर अर्जातील सुधारणा किंवा बदल एजन्सीद्वारे स्वीकारले जाणार नाहीत.

परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
ही परीक्षा ६ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान होणार होती. पण आता एनटीएने त्यात बदल केला आहे. त्यानुसार आता ६ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान पहिल्या स्लॉटमध्ये परीक्षा घेण्यात येईल. तर दुसऱ्या स्लॉटमध्ये ही परीक्षा १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. एजन्सीने या संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या डिसेंबर आणि जून सत्र २०२१ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले आहेत.

NTA च्या मते, १० ऑक्टोबर रोजी UGC NET परीक्षेबरोबरच इतर काही प्रमुख परीक्षा देखील त्या दिवशी होणार आहेत. या परीक्षार्थीं परीक्षेच्या तारखांमध्ये बदल व्हावा अशी मागणी केली होती. यांची अडचण समजून घेऊन उमेदवारांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी यूजीसी नेटने डिसेंबरच्या काही तारखांमध्ये पुन्हा बदल केला आहे. UGC NET 2021 ऑक्टोबर परीक्षेच्या नवीन परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर करण्यात आले आहे.

अर्जात दुरुस्ती करण्यासाठी क्लिक करा
NTA NEET च्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.