UGCNET & SET

UGCNET & SET

राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२३: परीक्षेची नोव्हेंबर अखेर घोषणा

PUBLISH DATE 10th October 2023

राज्यातील प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा अर्थात ‘महाराष्ट्र सेट’चे वेळापत्रक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे.

नुकतेच मार्च २०२३ मध्ये ३८ व्या सेट परीक्षेचे आयोजन केले होते. सप्टेंबर संपला तरी, सेटची घोषणा न झाल्यामुळे उमेदवार अस्वस्थ होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली असून, नोव्हेंबर अखेर परीक्षेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) आयोजन करण्यात येते. १७ शहरांमध्ये आयोजित होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. सर्वच विद्याशाखांतील एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाते. सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेबरोबरच पीएच.डी. प्रवेशासाठीही या परीक्षेचा विचार करण्यात येतो. त्यामुळे राज्यभरातील सर्वच पदव्युत्तर, पदवीधारक या परीक्षेसाठी अर्ज करतात. विद्यापीठाकडून मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या सेट परीक्षेमध्ये ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले होते. परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून एक लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख एक हजार २५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील सहा हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदाही एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देण्याची शक्यता आहे.

सेट म्हणजे काय
विद्यापीठ अनुदान आयोगाने वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक पदासाठी किमान पदवीबरोबरच पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. महाराष्ट्रामध्ये १९९४ पासून राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेटचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे करण्यात येते. सेट परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी कोणतीही तरतूद नाही.

सेटसाठी पात्रता
- उमेदवाराने ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच विषयाची परीक्षा त्याला देता येते.
- एखाद्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात सेट परीक्षा घेतली जात नसेल तर त्या विषयाशी संबंधित इतर विषयाची परीक्षा देता येते.
- इंग्रजी किंवा मराठी या दोन माध्यमातून परीक्षा देता येते

मार्च २०२३मध्ये पार पडलेल्या सेट परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. आता पुढील सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घोषित करण्यात येईल.
- डॉ. प्रफुल्ल पवार, सदस्य सचिव, महाराष्ट्र सेट

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२३: परीक्षेची नोव्हेंबर अखेर घोषणा
22nd September 2023

JKSET 2023: Admit card released

राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२३: परीक्षेची नोव्हेंबर अखेर घोषणा
31st December 2022

UGC NET 2023: Schedule released

राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२३: परीक्षेची नोव्हेंबर अखेर घोषणा
30th December 2022

UGC NET 2023: How to apply

राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२३: परीक्षेची नोव्हेंबर अखेर घोषणा
7th November 2022

UGC NET 2022: Results declared

राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२३: परीक्षेची नोव्हेंबर अखेर घोषणा
27th September 2022

UGC NET 2022: Admit Card released

राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२३: परीक्षेची नोव्हेंबर अखेर घोषणा
19th February 2022

UGC NET 2021: Result Declared