UGCNET & SET

UGCNET & SET

यूजीसी नेट परीक्षा २०२२: विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 6th July 2022

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सहायक प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ९, ११ व १२ जुलै व १२, १३, १४ ऑगस्ट या तारखांना होणार आहे.

डिसेंबर २०२१मध्ये नेट परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन्ही सत्रांची एकच सामायिक परीक्षा घेण्याचा निर्णय 'एनटीए'कडून घेण्यात आला आहे. या परीक्षेचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक 'एनटीए'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) या पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे.

९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ३५ विषयांची निवड करण्यात आली असून, नऊ जुलैला २६, ११ जुलैला पाच, तर १२ जुलैला चार विषयांची परीक्षा होणार आहे. यात सर्व प्रकारच्या भाषा, राज्यशास्त्र, संरक्षण शास्त्र, होम सायन्स, मानवी अधिकार अशा विषयांचा समावेश आहे. १२, १३ व १४ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे 'एनटीए'कडून स्पष्ट करण्यात आले आहे. जुलै महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 'एनटीए'च्या वेबसाइटद्वारे मिळणार असून, त्या संदर्भातील माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नेट परीक्षेसंदर्भातील इतर अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 'एनटीए'च्या वेबसाइटवर सातत्याने संपर्क करत राहावा, परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे 'एनटीए'कडून सांगण्यात आले आहे. https://ugcnet.nta.nic.in व www.nta.ac.in या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

परीक्षेविषयी महत्त्वाचे...

१. ९, ११ व १२ जुलैला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

२. १२ ते १४ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

३. जुलैमधील परीक्षांसाठीच्या प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांनी 'एनटीए'च्या वेबसाइटशी संपर्क साधावा.

४. डिसेंबर २०२१ व जून २०२२ची परीक्षा एकत्र होणार.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


यूजीसी नेट परीक्षा २०२२: विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर
22nd September 2023

JKSET 2023: Admit card released

यूजीसी नेट परीक्षा २०२२: विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर
31st December 2022

UGC NET 2023: Schedule released

यूजीसी नेट परीक्षा २०२२: विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर
30th December 2022

UGC NET 2023: How to apply

यूजीसी नेट परीक्षा २०२२: विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर
7th November 2022

UGC NET 2022: Results declared

यूजीसी नेट परीक्षा २०२२: विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर
27th September 2022

UGC NET 2022: Admit Card released

यूजीसी नेट परीक्षा २०२२: विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर
19th February 2022

UGC NET 2021: Result Declared