UGCNET & SET

UGCNET & SET

सीएसआयआर-यूजीसी नेट जून परीक्षा २०२१: परीक्षा केंद्रांची माहिती जाहीर

PUBLISH DATE 25th January 2022

सीएसआयआर-यूजीसी नेट जून २०२१ परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)ने जॉइंट सीएसआयआर-यूजीसी नेट जून २०२१ परीक्षेसाठी उमेदवारांना वाटप केलेल्या परीक्षा शहरांच्या माहितीसाठी ‘अॅडव्हान्स्ड सिटी इंफॉर्मेशन स्लिप’ जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी विविध विषयांसाठी लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) च्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (NET)अर्ज केला आहे, ते आपल्याला मिळालेल्या परीक्षा केंद्राची माहिती प्रवेश पत्र मिळण्याआधीच माहित करून घेऊ शकतात.

उमेदवारांना सर्वसाधारणपणे परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती अॅडमिट कार्डद्वारे दिली जाते. पण कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना परीक्षेसाठी त्यांची प्रवासाची योजना आखण्यासाठी मदत व्हावी म्हणून परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती आगाऊ कळवली जाते.

असे जाणून घ्या परीक्षा केंद्राचे शहर

सीएसआयआर-यूजीसी नेट जून २०२१ परीक्षेच्या उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्राची माहिती हवी असल्यास त्यांनी परीक्षा पोर्टल, csirnet.nta.nic.in ला भेट द्यावी. यानंतर होम पेज वर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल. नव्या पेजवर उमेदवारांना आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि अन्य माहिती भरून सबमीट करा. यानंतर उमेदवार आपली ‘अॅडव्हान्स्ड सिटी इंफॉर्मेशन स्लिप’ डाऊनलोड व प्रिंट करा.
 

अॅडमिट कार्ड लवकरच

परीक्षा शहराची माहिती उपलब्ध करण्यासोबतच एनटीएने सीएसआयआर यूजीसी नेट अॅडमिट कार्ड २०२२ जारी करण्यासंबंधीचे अपडेट आपल्या २३ जानेवरी २०२२ च्या परिपत्रकात दिले आहे. यानुसार उमेदवारांना प्रवेश पत्र लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

एनटीएद्वारे सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ परीक्षेचे आयोजन याच आठवड्यादरम्यान २९ जानेवारी आणि नंतर १५ ते १७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत केले जाणार आहे.

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.