UGCNET & SET

UGCNET & SET

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप सक्तीची; यूजीसीचा निर्णय

PUBLISH DATE 14th May 2022

देशातील पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप (Internship for UG students) सक्तीची करण्यात येणार आहे.

आठ ते दहा आठवड्यांची ही इंटर्नशिप विद्यार्थी सुट्यांच्या कालावधीत पूर्ण करू शकणार आहेत. पदवी स्तरावर इंटर्नशिप केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. तसचे देशातील संशोधन, इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान विकास या संकल्पनांना पूरक असे हे धोरण असणार आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी पदवी घेतली, तरी त्यांच्याकडे नोकरीसाठी पूरक अशी कौशल्ये नसतात, अशी ओरड सातत्याने होत असते. यामुळे विद्यार्थ्यांना कार्यानुभव मिळावा, या उद्देशाने ही इंटर्नशिप सक्तीची करण्यात आली आहे. आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १० क्रेडीट्सही दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना विशेषत: संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही इंटर्नशिप सक्तीची असणार आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनाची साधने, तंत्र, पद्धती, उपकरणे आदींचा परिपूर्ण अभ्यास करावा हा या मागचा उद्देश आहे. विद्यार्थी दुसऱ्या आणि चौथ्यासत्रानंतर ही इंटर्नशिप पूर्ण करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांनी आठवड्याला किमान ४५ तासाला एक क्रेडीट अशा हिशोबाने ४५० तासांची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर १० क्रेडीट्स दिले जाणार आहेत. इंटर्नशिपवर करडी नजर ठेवण्यासाठी इंटर्नशिपदरम्यान करण्यात येणारी कामे, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्यात याबाबतही आयोगाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप नेमकी कुठे आहे हे कळण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टलही सुरू करण्यात येणार आहे, असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप सक्तीची; यूजीसीचा निर्णय
22nd September 2023

JKSET 2023: Admit card released

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप सक्तीची; यूजीसीचा निर्णय
31st December 2022

UGC NET 2023: Schedule released

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप सक्तीची; यूजीसीचा निर्णय
30th December 2022

UGC NET 2023: How to apply

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप सक्तीची; यूजीसीचा निर्णय
7th November 2022

UGC NET 2022: Results declared

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप सक्तीची; यूजीसीचा निर्णय
27th September 2022

UGC NET 2022: Admit Card released

पदवी अभ्यासक्रमांना इंटर्नशिप सक्तीची; यूजीसीचा निर्णय
19th February 2022

UGC NET 2021: Result Declared