UGCNET & SET

UGCNET & SET

यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर

PUBLISH DATE 22nd January 2022

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राष्ट्रीय पात्रता चाचणी २०२० (UGC NET 2020, 2021 Answer Key) उत्तरतालिका जाहीर केली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

डिसेंबर आणि जून टप्प्यातील यूजीसी नेट २०२१ च्या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून त्यांची उत्तरे तपासता येणार आहेत. वेबसाइट तपासण्यासाठी काही सोप्या स्टेप्स देखील देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने उमेदवार त्यांच्या स्कोअरचा अंदाज लावू शकतात.

यूजीसी नेट उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा. त्यानंतर होमपेजवर यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ साठी लिंकवर क्लिक करा. स्क्रिनवर उत्तरतालिकेचे पेज खुले होईल. यावर ऍप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा. उत्तरतालिका डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआउट घ्या.
यूजीसी नेट उत्तरतालिका डाऊनलोड केल्यानंतर, उमेदवारांना त्यांची उत्तरे तपासा. यामध्ये काही त्रुटी असल्यास ते आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी उमेदवारांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत वेळ देण्यात आली आहे.

एनटीएने यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ परीक्षा तीन टप्प्यात घेतली होती. त्यानुसार, पहिला टप्पा २० नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आला. दुसरा टप्पा २४ डिसेंबर २०२१ ते २७ डिसेंबर २०२१ दरम्यान पार पडला. तिसरा टप्पा ४ आणि ६ जानेवारीला पार पडला. त्यात कन्नडच्या पुनर्परीक्षेचाही समावेश होता.
एकूण ८१ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व परीक्षांची उत्तरतालिका आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल. त्यानंतर लवकरच निकालही जाहीर केला जाणार आहे.
--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठव

 


Related News


यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
22nd September 2023

JKSET 2023: Admit card released

यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
31st December 2022

UGC NET 2023: Schedule released

यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
30th December 2022

UGC NET 2023: How to apply

यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
7th November 2022

UGC NET 2022: Results declared

यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
27th September 2022

UGC NET 2022: Admit Card released

यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
19th February 2022

UGC NET 2021: Result Declared

यूजीसी नेट जून २०२१ आणि डिसेंबर २०२० परीक्षांच्या उत्तरतालिका जाहीर
26th November 2021

UGC NET 202: Expected Cutoff