IIT-JEE Admissions 2024-25

IIT-JEE Admissions 2024-25

Degree Course Admission : यंदा प्रवेशासाठी चुरस

PUBLISH DATE 23rd May 2024

यंदा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७५ ते ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील चुरस वाढण्यास ते महत्त्वपूर्ण कारण ठरेल. शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांचे गुणही तसेच सर्वोत्तम लागतील.

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत ७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आठ हजार ७८२ आहे. तर, ७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे एकूण एक लाख ९२ हजार ५५४ विद्यार्थी आहेत. यंदाही ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शहरातील नामांकित महाविद्यालयात पहिल्या यादीत प्रवेश मिळेल. पण तरीही ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चुरस रंगण्याची शक्यता आहे.

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये

  • विज्ञान शाखेत कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, गणित, संख्याशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याला पसंती

  • व्यावसायिक आणि कौशल्यप्रधान अभ्यासक्रमांना महत्त्व

  • इंटिग्रेटेड कोर्सेसला विद्यार्थ्यांकडून प्राधान्य

  • बी. व्होक अभ्यासक्रमांना मिळणार पसंती

  • वाणिज्य शाखेत वाढती मागणी, यांसह सीए, सीएस वाढती मागणी

  • कला शाखेत मानसशास्त्रातून पदवी करण्याला पसंती

  • ओपन अँड डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून शिकणाऱ्या

  • विद्यार्थ्यांची संख्या वाढणार

टक्केवारीनिहाय विद्यार्थी संख्या

  • ८,७८२ - ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • २८,७५३ - ८५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • ६०,१६५ - ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • ९४,८५४ - ७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • १,२८,७७१ - ७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • १,६०,२२७ - ६५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • २,०५,९५८ - ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • ५,४८,४१० - ४५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक

  • १,५१,२१५ - ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण

शिक्षण महाग वाटणारे आणि चांगले गुण असणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ओपन ॲण्ड डिस्टन्स लर्निंग’मध्ये नोकरी करता-करता शिक्षण घेण्याला प्राधान्य देतील. तर आर्थिक अडचण नसणारे आणि बारावीत विशेष श्रेणी, ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले बहुतेक विद्यार्थी पदवीसाठी व्यावसायिक आणि कौशल्यप्रधान अभ्यासक्रमाची निवड करतील. पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाबरोबरच बी.व्होकेशनलचा पर्यायही विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

 

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


Degree Course Admission : यंदा प्रवेशासाठी चुरस
21st December 2022

JEE Main 2023

Degree Course Admission : यंदा प्रवेशासाठी चुरस
23rd October 2020

JEE Main 2021 Syllabus

Degree Course Admission : यंदा प्रवेशासाठी चुरस
7th September 2020

NTA JEE Main Result 2020

Degree Course Admission : यंदा प्रवेशासाठी चुरस
7th November 2019

JEE Advanced on May 17